सुट्टी पे सुट्टी… !
सुट्टी हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा. ती कोणाला नको असते? अगदी शाळेतल्या मुलांपासून ते शिक्षकांपर्यंत, सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते कॉर्पोरेट अधिकाऱ्यांपर्यंत.. किंवा मग डॉक्टरांपासून वकिलांपर्यंत… आणि कोर्टापर्यंत सुद्धा.. […]
सुट्टी हा विषय सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा. ती कोणाला नको असते? अगदी शाळेतल्या मुलांपासून ते शिक्षकांपर्यंत, सरकारी कर्मचाऱ्यांपासून ते कॉर्पोरेट अधिकाऱ्यांपर्यंत.. किंवा मग डॉक्टरांपासून वकिलांपर्यंत… आणि कोर्टापर्यंत सुद्धा.. […]
गायिका, निवेदिका, निर्मात्या नीला रविंद्र यांचा जन्म १७ जूनला मुंबईत झाला. नीला रविंद्र भिडे हे त्यांचे पूर्ण नाव. आपल्याला त्या नीला रविंद्र म्हणूनच माहीत आहेत. माहेरच्या त्या नीला जोशी. उत्तम निवेदिका आणि आयोजिका म्हणून त्यांनी काम केले आहे. तसेच गायनातही त्यांनीआपला स्वतःचा ठसा उमटला आहे. पार्ल्यातील महात्मा गांधी रोडवरील ज्या भिडे कुटुंबियांच्या वास्तूत सुरवातीच्या काळात नुकतीच […]
देशविदेशातल्या प्राच्यविद्येतल्या संशोधन करणाऱ्या अनेक विद्वानांशी त्यांचे मैत्रीपूर्ण, जिव्हाळ्याचे संबंध आहेत. देशोदेशातल्या हस्तलिखितांचा शोध घेणं, त्यांचे जतन आणि संवर्धन करणं तसेच त्यातील ज्ञान विशेषतः भारतीय संस्कृती टिकवण्यासाठी त्या त्याअभ्यासकांना माहिती पुरवणं, त्यांची वेगवेगळ्या प्रकारे ओळख करून देणं अशी अनेक कामे ते अत्यंत दृढ सेवाभावाने करत आहेत. […]
मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली ती चक्क एका भांडणातुन. पण त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हनजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला. अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला. […]
थोड्याच वेळाने आणखी एक टांगा आला. त्यामागे कोणीतरी पळत होते आणि मोठ्याने ओरडत होते, ‘गोंद्या आला रे आला ! गोंद्या आला रे आला! तीच खूण ठरली होती. ते इशाऱ्याचे वाक्य होते. झाडीत लपलेले दामोदर हरी चाफेकर सरसावले. ते स्वतःशी म्हणाले, होय, हीच रँड साहेबाची गाडी आहे. मघाच्या टांग्यात दुसरा कोणीतरी साहेब असेल. बाळकृष्णाने घाई केली, पण त्यात काही बिघडले नाही. मुख्य रँडसाहेब मला सापडला म्हणजे योजना यशस्वी झाली. त्यांनी हाताने खूण करून वासुदेवाला थांबविले. चित्ता हरिणावर झेप घेतो त्याप्रमाणे त्यांनी टांग्यावर उडी मारली. छपरामुळे पडदा होता तो त्यांनी सर्रकन् बाजूला सारला. रँडच्या बरगड्यांजवळ पिस्तुल नेऊन त्यांनी सटासट गोळ्या झाडल्या. रँड गाडीतच कोसळला.
[…]
नातेवाईक, मित्र-मैत्रिणी आजूबाजूचे लोक यांच्याशी त्यांना काहीही देणंघेणं नसतं. स्वमग्न मुलांमध्ये प्रामुख्याने जाणवणारी समस्या म्हणजे भाषा संप्रेषणाची, वैचारिक देवाण-घेवाणीची. सोप्या शब्दात समजावयाचं म्हणजे, जर आपल्याला एखाद्या अनोळखी प्रदेशात, अनोळखी लोकात एकटे नेऊन सोडले तर? आपण गोंधळून जाऊ, आपल्याला त्या लोकांची भाषा समजणार नाही वा आपली त्यांना! अशावेळी आपली जी स्थिती होईल नेमकी तशीच स्थिती या स्वमग्न मुलांची असते. म्हणूनच ही मुलं परिसराशी संपर्क नसल्यासारखी वागतात. बाह्य जगाशी यांचा काहीही संबंध नसतो. […]
ज्या जोडीदाराशी भावनिक, वैचारिक जवळीक असेल त्याच व्यक्तीशी लग्न करायला पाहिजे, तरच समाजमान्य आणि तरीही मनपसंत पद्धतीने शारीरिक संबंध शक्य आहेत. भावनिक, वैचारिक जवळीकीसाठी बराच वेळ लागतो. त्या काळात दोन-तीन भावी जोडीदारांशी एकाच काळात चर्चा-भेटी चालू असल्या तरी काही बिघडत नाही. […]
इतक्यात घड्याळाचा टोल वाजतो आणि त्यामुळे आदित्य दचकतो. काही क्षणातच पुन्हा त्याला, त्याच्या आरामखुर्ची हलण्याचा आवाज येतो. इतक्यात थंडीतही आदित्यच्या कानामागून घाम ओघळू लागतो. आदित्य हळूहळू आरामखुर्चीच्या दिशेने निघतो आणि समोर जे काही बघतो, ते बघून त्याची पाचावर धारण बसते. […]
२०*३० च्या आयतावर वाकडे तिकडे हावभाव करून , हातपाय झाडत त्या खाली बसलेल्या रिकामटेकडया लोकांना हसवणं किंवा रडवणं. आहे काय त्यात? हे सहज कोणीही करू शकतं. […]
वेब सिरिज बनविणं हा खूप कठीण Task असतो. नुसती कथा लिहिली एका मित्राने हौशीसाठी कॅमेरा विकत घेतला त्याला शूटींगसाठी बोलावलं आपल्यातल्या काही फिल्मवेड्या मित्रांनी दिग्दर्शन व अभिनय केला इतकं सोपं ते नक्कीच नसतं. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions