मद्रास दिवस
मद्रास डे हा सण , तामिळनाडूतील मद्रास (आताचे चेन्नई) स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा सण आहे. दरवर्षी हा सण २२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. २२ ऑगस्ट १६३९ ही तारीख मद्रासपट्टणम किंवा चेन्नापट्टणम ह्या गावाच्या खरेदीसाठी अधिकृतपणे घोषित करण्यात आली. हे गाव ईस्ट इंडिया कंपनीचे घटक असलेल्या अँड्र्यू कोगन व फ्रान्सिस डे यांनी त्यावेळचे विजयनगरचे व्हाइसरॉय दमर्ला वेंकटाद्री नायक यांच्याकडून खरेदी केले. […]