नवीन लेखन...

अनिल, लिखते रहो !

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार जाहीर झाला. बालसाहित्याच्या दृष्टीने ही बाब महत्त्वाची आहेच, पण अनिल अवचटांसारख्या समाजकार्यात रमलेल्या लेखकाच्या वेगळ्या प्रयत्नाला मिळालेली दाद म्हणूनही या पुरस्काराचे मोल आहे. गेल्या काही वर्षांमध्ये बालसाहित्याकडे वळलेल्या आणि कसदार साहित्य निर्मिती करणार्‍या डॉ. अवचटांचे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केलेले कौतुक. […]

पॉलिसी लॅप्स झालीय ?

काही वेळा विमा पॉलिसीचे हप्ते भरायचे राहून जातात किवा आर्थिक अडचणींमुळे ते भरता येत नाहीत. अशा वेळी पॉलिसी लॅप्स होते. लॅप्स झाल्यानंतरच्या कालावधीत विमाधारकास काही झाल्यास पॉलिसीचे फायदे मिळू शकत नाहीत. म्हणून पॉलिसी लॅप्स होऊ देऊ नये. अर्थात लॅप्स झाल्यानंतरही पॉलिसी पुन्हा सुरू करणे शक्य असते. मात्र, अशा वेळी विमा कंपनीचे काही निकष पूर्ण करावे लागतात. […]

द ग्रेट डायमंड रॉबरी !

गोरेगावमधील एनसीसी मैदानावरील भारतीय आंतरराष्ट*ीय दागिने प्रदर्शनात ‘दालुमी हाँगकाँग’ कंपनीच्या स्टॉलवरून तब्बल ६.६ कोटी रूपयांचे हिरे चोरीला गेले. सीसीटीव्हीच्या फुटेजमधून चार परदेशी हिरेचोरांचा संशय आल्यानंतर पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवली. इंटरपोल पथक आणि दुबई पोलिसांच्या मदतीने १० तासांच्या आत मेक्सिकोच्या चारही हिरेचोरांना दुबई विमानतळावर अटक करण्यात आली. […]

अर्जुनने घडवला इतिहास

गेल्या काही दिवसांमध्ये भारतीय क्रीडाक्षेत्राला सुवर्णयश अनुभवायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वी तेजस्विनी सावंतने जागतिक नेमबाजी स्पर्धेत प्रोन प्रकारात सुवर्णपदकावर शिक्कामोर्तब करत देशाची मान उंचावली. जागतिक क्रमवारीत दुसरा क्रमांक पटकावणारी सायना नेहवाल करोडो भारतीयांच्या अपेक्षा घेऊन जागतिक बॅडमिटन स्पर्धेत उतरली आहे. यापाठोपाठ अर्जुन अटवाल या गोल्फपटूने भारतीय क्रीडाक्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला. त्याने विडहॅम चॅम्पियनशीप ट्रॉफी जिंकत विक्रम केला. […]

अंतर्गत मतभेदांनी ग्रासले राज्यकर्ते

भिन्न मतप्रवाहांचे अनेक पक्ष एकत्र घेऊन सरकार चालवणे अवघड असल्याचा अनुभव पंतप्रधान डॉ. मनमोहन सिग यांना रोजच येत आहे. विविध पक्षांचे मंत्री एकमेकांवर आरोप करत असताना काँग्रेसचे वरिष्ठ मंत्रीही गेल्या काही दिवसांपासून सहकार्‍यांबद्दल जाहीर विधाने करताना दिसत आहेत. त्यांच्यात अनेक मुद्यांवर असलेले मतभेद सतत चव्हाट्यावर येत आहेत. अशा परिस्थितीत मनमोहन सिंग निष्प्रभ आणि हतबल दिसत आहेत. […]

मैत्री : निखळ, निकोप, निर्व्याज (फ्रेंडशिप डे विशेष)

मैत्री ही अतिशय सुंदर भावना आहे. एकमेकांसाठी सर्वस्व पणाला लावण्याची तयारी दाखवणारे खरे मित्र हा आयुष्याला लाभलेला खरा आधार. ‘तू किनारा गाठलास तर मी तुझ्याबरोबर आहे आणि तळाशी गेलास तर तुझ्या अगोदर आहे’ असं मैत्रीचं स्वरुप असायला हवं. पूर्वीच्या तुलनेत आजची मैत्री जास्त निकोप आणि निखळ आहे. निखळ मैत्रीमध्ये मोकळेपणा अभिप्रेत असतो आणि तो सध्याच्या मैत्रीत पहायला मिळतो.
[…]

शेतकर्‍यांना दिलासा पीककर्जाचा

शेतीक्षेत्रातील अनिश्चिततेवर तसेच आर्थिक संकटांवर मात करण्यासाठी शेतकर्‍यांना कर्जाचा आधार घ्यावा लागतो. त्यादृष्टीने पीककर्ज महत्त्वाचे ठरते. या पार्श्वभूमीवर या वर्षी राज्यात पीककर्ज वाटपाचे मोठे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शिवाय यंदाच्या खरीप हंगामात पीककर्जाची रक्कम २० टक्क्यांनी वाढवून मिळणार आहे. याबरोबरच घेतलेले आणखी काही निर्णय शेतकर्‍यांसाठी दिलासादायक ठरणार आहेत. […]

1 5 6 7
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..