माझे सूचीलेखन कार्य
१९७८ साली मी पीएच. डी. पदवी मिळवली. त्यानंतर काही दिवसात मला मराठी विभागाचे पत्र आले. विभागाने वाड़्मयीन नियतकालिकांवर एक प्रकल्प घेतला होता. त्या आधी पुष्पा भावे यांनी ‘विविधज्ञानविस्तार’ या एकोणिसाव्या शतकातील नियतकालिकावर पीएच. डी. पदवीकरिता प्रा. अ.का. प्रियोळकर यांच्याकडे नाव नोंदवले होते आणि त्या नियतकालिकामधील लेखांची सूचीही केली होती. […]