‘घरगुती’ अतिरेकी
तात्यासाहेब माझ्यासमोर बसले होते. त्यांची मुद्रा सतत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान याच आविर्भावात असते, तशीच ती आताही होती. माझ्या मुद्रेवर कायम लोकांचे ऐके ब्रह्मज्ञान’ असे भाव असल्याने मी ज्ञानकण वेचण्याच्या तयारीत होत. तात्यांनी अर्थपूर्ण पॉज घेतला आणि म्हणाले, “आता हेच बघ ना, हळद ही काही हळद नव्हे.” मी चकितच झालो. आपला वाणी गेली अनेक वर्षे आपल्याला हळद नामे जी पिवळ्या रंगाची पूड देतो ती हळदच नव्हे? […]