पर्जन्य चक्र
उन्हाने काहिली होत असताना नचिकेत प्रकाशन चे “पर्जन्य चक्र” हाती आले. प्रा. उमा पालकर या विद्वान प्राध्यापिकेने लिहिलेले हे पुस्तक अतिशय वाचनीय आहे. अभ्यासपूर्ण आहे परंतु कुठेही किचकट, रटाळ झालेले नाही. पर्जन्य, हवामान, मेघ, वादळे यांची शास्त्रोक्त माहिती अतिशय रोचक भाषेत दिली आहे. सामान्यांना या सगळ्या विषयांची माहिती होते आणि अभ्यासू लोकांना देखील हे पुस्तक आपले वाटते, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे.
“पर्जन्य चक्र” (मेघ, वीज , वादळवारा आणि पाऊस.)
पाने : 166, किंमत : 170 रू.
प्रकाशक : नचिकेत प्रकाशन