व्याघ्र प्रकल्पांच्या बफरझोनमध्ये पर्यटक बंदी आणि समस्यांचे वास्तव सत्य …!
सर्वोच्च न्यायालयाने व्याघ्र प्रकल्पांच्या केंद्रास्थानाच्या परिसरात (कोअर झोन) पर्यटक बंदी लागू करीत वाघांच्या शिकारीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला, यामुळे तमाम वन्यजीव प्रेमींना आनंद झाला. पर्यटक बंदीमुळे पर्यटकांची अनौपचारिक देखरेख संपृष्टात आल्याने वनअधिकारी निर्ढावल्यासारखे वागायला लागतील, याचा वारंवार प्रत्यय येतही आहे. बंदी असलेल्या जंगलात वनअधिकारी फिरतात की नाही हे पाहतो कोण ? वाघांच्या शिकारी झाल्यावर त्या इतरांना कळणार नाही, याची काळजी घेण्यात हा विभाग मोठा पटाईत आहे. आणि ते कळल्यास, कश्या प्रकारे नैसर्गिक मृत्यु झाला आहे हे सिद्ध करण्याची किमया हाच विभाग करू शकते. बफर झोन / कोअर झोन हा या वनविभागासाठी कम्फर्टेबल झोन ठरणार आहे.
[…]