नवीन लेखन...

सी. डी. देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची रौप्यमहोत्सवी घौडदौड

युवकांना प्रशासकीय सेवेसंदर्भात अचूक मार्गदर्शन करण्यासाठी ठाण्यामध्ये चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली. प्रशासकीय सेवेमध्ये करियर घडवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने ही संस्था चालविण्यात येते.
[…]

“मी”

माणसाचा अहंभाव रसातळाला नेतो. समाजात राहून आपल्या वेगळ्याच भ्रमात राहणा-या लोकांचे परिवर्तन या शब्दपुष्पाच्या माध्यमातून होर्इल अशी आशा बाळगूया!
[…]

मंत्रालयाच्या आगीपासून धडा घ्या! नागपूरला खर्‍या अर्थाने उपराजधानी करा!

मंत्रालयाला लागलेल्या आगीत सरकारची आपत्कालीन संरक्षण यंत्रणा भस्मसात झाली. आणीबाणीच्या प्रसंगी ज्या यंत्रणेवर विसंबून राहावे, तीच आपत्तीची बळी ठरत असेल, तर मुळातच कुठेतरी भयंकर चूक होत असल्याचे मान्य करावे लागेल. हा संदर्भ केवळ मंत्रालयाच्या आगीपुरता मर्यादित नाही. या सरकारच्या धोरणाने संपूर्ण राज्य आणि त्यातही गरीब शेतकरी वर्ग अगदी नेमाने संकटाच्या आगीत होरपळत असतो. त्यातही विदर्भातील शेतकर्‍यांची दैना अधिकच अस्वस्थ करणारी आहे. सरकारने आपले अर्धे मंत्रालय नागपूरला हलविले, तर किमान या शेतकर्‍यांना हे सरकार आपल्यासाठी काही करू इच्छिते याचे समाधान तरी लाभेल.
[…]

मर्ढेकरांची कविता – आला आषाढ श्रावण

मर्ढेकरांची “आला आषाढ श्रावण, आल्या पावसाच्या सरी ;” ही कविता पहिल्यांदा वाचल्यावर निसर्गवर्णनपर कविता वाटते. परंतु कवितेतील हा पाउस वेगळाच आहे. ह्या कवितेला दुसऱ्या महायुध्दात अमेरीकेने जपानवर टाकलेल्या अणुबाँबचा संदर्भ आहे. अमेरीकेने जपानमधील हीरोशिमा व नागासकी याशहरांवर अणुबॉंब टाकल्यावर पडलेला किरणोत्सर्गी असा हा पाऊस आहे.
[…]

“ई-कचर्‍याची गंभीर समस्या”

आपण आपल्या घरातील टाकाऊ वस्तू, कचरा नेहमीच घराबाहेर फेकून देतो. सोसायटीच्या आवारात, सार्वजनिक रस्त्यांवर, अगदी कुठेही आपण कचरा फेकतो. या कचर्‍यात इ-कचराही असतो. मात्र त्याबद्दल आपल्याला कोणी प्रश्न विचारत नाही किंवा दंडही करत नाही. 
[…]

मेकालेच्या शिक्षणाने आमच्या संवेदना शून्य केल्यात..!

इंग्रजांना हद्दपार करून ६५ वर्षे झालीत, भारतीयांच्या संवेदना नष्ट करणाऱ्या लॉर्ड मेकालेच्या कथित शिक्षण पद्धतीला केव्हा हद्दपार करणार आहोत ? जाती, धर्म,पंथ, प्रांत, भाषा या शुल्लक बाबींवरून लढण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या कलंकाला केव्हा पुसणार आहोत ?
[…]

औचित्य जागतिक दृष्टीदान दिनाचे !

मानवाच्या शरीराची पंच इंद्रिये त्यांना नेमून दिलेले कार्य करणारी असतील तर त्यांचा उपयोग आहे. शरीरावर नुसती पंचेंद्रिये असून काय फायदा? ती सशक्त, सुद्रुढ व कार्यरत नसतील तर काय कामाची? तसेच अगदी सुंदर रेखीव मासोळीदार काळेभोर टपोरे डोळे आहेत पण ते बघू शकत नाहीत तर त्यांचा काय उपयोग? दैनंदिन जीवनात पदोपदी डोळ्यांची आवश्यकता भासते.
[…]

कशी असते जमिनीची मोजणी

आपल्याकडे स्वत:च्या मालकीची अथवा वडिलोपार्जीत जमीन असेल तर त्याची मोजणी ही आपल्याला करावीच लागते. जमिनीची मोजणी कशी केली जाते ? दिवसेंदिवस जमिनीचा होणारा विकास, शहरीकरण, औद्योगिकरण अन्य विकासाची कामे यासाठी होणारा जमिनीचा वापर, तसेच आपापसातील हद्दीचे वाद सोडविण्यासाठी त्या जमिनीची प्रथम मोजणी करुन मूळ नकाशाच्या आधारे हद्दीच्या खुणा कायम करुन भूमापकाकडून दाखले दिले जातात.
[…]

1 142 143 144 145 146 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..