जागतिक भ्रस्टाचार रिपोर्ट २०११ ( जागतिक पर्यावरण बदल )……!!!
खरेच बदलते जागतिक पर्यावरण व तसेंच जागतिक मदत कार्य
कारणीभूत ठरेल भ्रस्टाचार वाढण्यास …………..!!!!
[…]
खरेच बदलते जागतिक पर्यावरण व तसेंच जागतिक मदत कार्य
कारणीभूत ठरेल भ्रस्टाचार वाढण्यास …………..!!!!
[…]
फाटकसरांचं आणि माझ्या आईचं लांबचं नातं होतं .त्यामुळे काही घरगुती कार्यात किंवा समारंभात मी त्यांना अनेकदा पण दुरूनच पाहिलं होतं. याखेरीज, जिथे जिथे विद्येची उपासना चाले, तिथे तिथे सर दिसत. ते ग्रंथसंग्रहालयात असोत की साहित्य संघात, भारतेतिहास संशोधन मंडळात किंवा प्राज्ञ पाठशाळेत ते कुठेही असले तरी आजूबाजूला माणसांचा गराडा आणि सरांचं अव्याहत बोलणं असा त्या बैठकीचा बाज असे.
[…]
तंबी दुराई यांचं ‘दोन फुल एक हाफ’ हे सदर आता रविवारच्या सुट्टीचा अविभाज्य भाग बनलंय. या सदरातल्या विनोदाच्या आविष्करणातली विविधता आणि सातत्य हे वाचकांना अचंबित करणारं आहे. मराठी साहित्यातला विनोद संपलाय अशी हाकाटी करणाऱ्यांना हे सदर ही छानशी चपराकच आहे. विनोदी साहित्याचा आढावा घेणार्यांना दखल घ्यायला लावीलच अशी तंबी यांची ही कामगिरी आहे.
[…]
आधुनिक शिक्षा शास्त्रज्ञांना एक महत्वाचा प्रश्न सतावीत असतो की, जुन्या काळच्या शिक्षा नवीन गुन्हेगारांनादेखील चालू ठेवणे योग्य ठरेल का? त्यात आवश्यक बदल करता येतील का? बदल कोणत्या प्रकारच्या गुन्हेगारांना करता येईल? गुन्हेगारांना समाजाच्या मुख्य प्रवाहात कशा प्रकारे सामील करावे आणि त्यांचा गुन्हेगारीचा डाग नाहीसा करून ते समाजाचे चांगले घटक कसे बनतील?
[…]
आजच्या संगणकीय व माहितीतंत्रज्ञानाच्या महायुगात अवतरलेलं जागतिकीकरण ही भांडवल, वस्तू, तंत्रज्ञान व सेवा यांना (प्रत्यक्ष मनुष्यबळ वगळता) सर्वसाधारणपणे निर्बंधमुक्त वातावरणात एका देशातून जगातल्या दुसर्या कुठल्याही देशामधे ये-जा करू देणारी, प्रामुख्याने ’आर्थिक-प्रक्रिया‘ असली तरी जीवनातील इतर क्षेत्रेही प्रभावित करण्याएवढी तिची व्याप्ति व शक्ति मोठी आहे.
[…]
डॉ. बाबासाहेब आंबेडकर १४ नोव्हेंबर, १९५४ साली हैद्राबादयेथील ’मराठवाडा साहित्यपरिषदेत‘ भाषण करताना म्हणाले होते की, ”भारतातील सर्वभाषिक प्रांतात अत्यंत दुर्दैवी प्रांत कुठला असेल, तर तो ’महाराष्ट्र‘ होय! इतर परप्रंातीयांकडून संपूर्णपणे नागवला गेलेला, हा भोळाभाबडया माणसांचा प्रदेश आहे. भारतीय नागरिक सर्व एक, हे जरी खरे असले, तरी व्यवहारात ही भावना निरर्थक आहे. राजकारणात हे औदार्य अंगलट येते व भोळयाभाबडयांचा घात होतो!“ आधुनिककाळाच्या रेटयात या ’नागवल्या गेलेल्या व म्हणूनच मागे पडलेल्या‘ भोळयाभाबडया मराठीजनांना, पुन्हा एकवार ’अटकेपार झेंडा‘ लावण्यासाठी व शिवछत्रपतींप्रमाणेच जाज्वल्य राष्ट्रधर्म निर्मिण्यासाठी गरज आहे, ती एका तेजस्वी व निरोगी-निर्व्यसनी तरूणपिढीची… आणि ही अशी ’पिढी‘, फक्त अविरत योगाभ्यासाच्या मजबूत ’शिडी‘वरच चढून गगनाला गवसणी घालू शकेल!!!“
[…]
माझ्या कळतेपणापासून गेली जवळ जवळ पन्नास वर्षे माडगूळला जाण्याची कल्पना निघाली की सर्व प्रथम कोणत्या मार्गाने जायचे याची चर्चा घरात जवळ जवळ जाण्याच्या आदल्या दिवसापर्यंत चालायची. काहींचे मत पडायचे की कोरेगाव मार्गाने आटपाडीपर्यंत जावे, तर काहींचे कऱ्हा-वीटा मार्गाने! कुठलाही मोठा घाट नसलेल्या सोलापूर रोडने इंदापूर आणि तिथून अकलूज सांगोला मार्गे थेट माडगूळलाच जावे, तर काहींचे म्हणणे फलटण-म्हसवड मार्ग जवळचा असल्याने त्याच मार्गाने जावे असे असायचे. मला स्वत:ला मात्र कुर्डुवाडीवरून बार्शीलाईट रेल्वेने सांगोला आणि तेथून मोटारने माडगूळला जाणेच खूप आवडायचे.
[…]
कुमार गंधर्व म्हटलं की मला हेरॅक्लिटसची आठवण यायची. ”तुम्ही एकाच नदीत पुन्हा पुन्हा पाऊल टाकूच शकत नाही; तुम्ही एकदा पाऊल टाकलं की पुन्हा पाऊल टाकेपर्यंत तिचं स्वरुप बदललेलं असतं” असं हेरॅक्लिटस म्हणे. कुमारांचं तसंच काहीसं होतं. त्यांचा एकदा बागेश्री ऐकला की पुन्हा तो तसाच यायचा नाही. अगदी तीच बंदिश असली तरी! ”टेसूल बन फुले, रंग छाये, भंवर रस लेत फिरत मद भरे” ही कुमारांची बंदिश मी प्रत्यक्ष मैफिलीत कितीतरी वेळा ऐकली असेल. […]
न्यू मिडीया या एका महत्त्वाच्या संकेतस्थळावर ठळकपणे लिहिलेले हे वाक्य एका नव्या पत्रकारितेच्या आश्वासक प्रवासाची नांदीच स्पष्ट करत आहे. नागरिक पत्रकार म्हणजेच सिटीझन जर्नालिस्ट हा सध्याच्या संगणक आणि माहिती तंत्रज्ञान युगात एक अभिनव आणि बर्यापैकी विश्वासार्ह असा जनतेचा थेट सहभाग असणारा पैलू समोर येऊ लागला आहे.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions