नवीन लेखन...

नात यशस्वी होण्यासाठी

स्वत:ला कामामध्ये, एखाद्या छंदामध्ये, मित्रांच्या घोळक्यात गुंतवून घेणे, किंवा बेसुमार टीव्ही पाहणं अथवा नशापाणी करणं. पण त्यांच्या समस्येचं उत्तर लग्न संबंधांच्या बाहेर उपलब्धं नसतंच. ते तर घरातच उपलब्ध असतं. तुम्ही दुस-या कुणाच्या प्रेमात पडूच शकत नाही असं मला म्हणायचं नाहिये. पडू शकता आणि त्यामुळे तुम्हाला काही काळाकरिता छान सुद्धा वाटू शकतं. पण काही वर्षानंतर तुम्ही, आज आहात त्याच परिस्थितीमध्ये असाल.
[…]

माणसाला प्रेरणा अधिक सुंदर जगण्याची …

थोरो म्हणतो त्याप्रमाणे तत्त्वज्ञानी होणे म्हणजे सूक्ष्म विचार जवळ असणे नव्हे किंवा एखादा पंथ किंवा संप्रदाय स्थापणे नव्हे! तर ज्ञानावर अपार प्रेम करणे व तद्‌नुरूप वागणे. साधे, स्वतंत्र उदार श्रद्धेचे जीवन जगणे होय. बेकन म्हणतो, प्रथम मनाच्या मंगल गोष्टी शोधा. त्या मिळवल्या म्हणजे उरलेसुरले आपोआपच मिळेल किंवा ते मिळाले नाही तरी त्याची खंत राहणार नाही. सत्य आपणास श्रीमंत करणार नाही; परंतु मुक्त मात्र करील. परंतु, कवी किट्‌सचे म्हणणे मात्र वेगळे आहे. सौंदर्यच सत्य आणि सत्यच सुंदर आहे. जीवनाचे रहस्यमय सौंदर्य नष्ट करण्याचे काम तत्त्वज्ञान करते. जीवनात सौंदर्य कशात आहे, तर त्याच्या रहस्यमयतेत आहे. म्हणून तर रामायण, महाभारत, होमरचे इलियड यांतील सौंदर्य कमी झाले नाही. शेक्‍सपियरने तर सर्व जगाला कवेत घेतले. पलीकडल्या झाडीत जो पक्ष्यांचा जीवनोत्सव चालला आहे, त्यात मला भाग घेता येत नाही, म्हणून मी कितीतरी वेळा अस्वस्थ झालो आहे. याला सुखवाद म्हणावे, कष्टवाद
[…]

अंध महिला पुनर्वसन समिती, अलिबाग

दृष्टी ही आपल्याला मिळालेली आतापर्यंतची सर्वात सुंदर व मौल्यवान भेट आहे. ज्या निसर्गात आपण लहानाचे-मोठे होतो त्या निसर्गाचे गहिरे रंग व विविध छटा, आपल्या आवडत्या व्यक्तींचे चेहरे व त्या चेहर्‍यांवरचं फुललेलं हास्य, दवात भिजलेली पहाट, मावळताना आजूबाजूच्या मखमली आभाळावर केशरी रंग सांडून गेलेला सूर्य, गाणारे पक्षी, रात्रीच्या गडद साम्राज्यात अवतरलेली अतिशय धीट अशी चंद्राची कोर, बेभान झालेला पाऊस, खवळलेला समुद्र, हिरव्यागार डोंगरांधून वाहणारे मोतीदार झरे, व या निसर्गसृष्टीला हिरवा श्वास देणारी झाडे या सर्व गोष्टीचं हृदयात चिरंतन जतन करण्यासाठी व आयुष्यात असे अनुभवलेले बहारदार क्षण व आठवणी अजरामर करून टाकण्यासाठी दृष्टीची नितांत गरज असते.
[…]

“प्रिय अमुचा ‘एक’ महाराष्ट्र देश हा”

महाराष्ट्र राज्य निर्मितीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने महाराष्ट्रातील जनतेला शुभेच्छा व अभिनंदन. स्वतंत्र महाराष्ट्र निर्मितीसाठी ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले त्यांचे स्मरण आपल्या प्रत्येकाला दर वर्षी १मे रोजी होते. परंतू सध्याचे राज्यकर्ते हुतात्म्यांचे बलिदान सार्थकी ठरवून आणि स्मरून साजेशी वागणूक महाराष्ट्रातील जनतेला देतात का ? त्यांच्या प्रश्नांची उकल करतात का ? त्यांच्या प्रश्नांना खरोखरच न्याय मिळतो का ? जर याचे उत्तर ‘होय’ असेल तर हुतात्म्यांच्या आत्म्यांना खरी श्रद्धांजली ठरेल. पण उत्तर ‘नाही’ असेल तर परिस्थिती नक्कीच राजकारणी व जनतेला आत्मचिंतन करणे जरूरीचे ठरेल.
[…]

सोहळा सोलडान्सचा

नृत्य ही दैवी देणगी असून तिच्यात केवळ मनुष्यप्राण्यालाच नाही तर सजीव सृष्टीलाही आनंदित करण्याची ताकद आहे
[…]

1 159 160 161 162 163 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..