यात्रा दमणची
दमणला जाण्याचा योग अचानक येईल असे वाटले नव्हते.आमच्या पर्यटनस्थळांच्या यादीत दमणचा क्रमांक उशिरा होता.परंतु २८ आणि २९ मे २०११ ला मी व माझी पत्नी वर्षा दमणची पर्यटन यात्रा करून आलो
[…]
दमणला जाण्याचा योग अचानक येईल असे वाटले नव्हते.आमच्या पर्यटनस्थळांच्या यादीत दमणचा क्रमांक उशिरा होता.परंतु २८ आणि २९ मे २०११ ला मी व माझी पत्नी वर्षा दमणची पर्यटन यात्रा करून आलो
[…]
होणारं मन! आयुष्य ओवाळायचं समर्पण!
आत्ता नाही, तर कधीच नाही, अशा या क्षणी जाणिवांचे बंद दरवाजे पूर्ण उघडायचे! वेळेची, प्रतिष्ठेची, वाढत्या वयाची, कुरकुरणार्या स्वभावाची सगळी कारणं दूर सारायची. उडेल थोडी तारांबळ, उडू दे! आपलं कावरंबावरं सैराट ध्यानही त्याला आवडतं! आखीव चेहर्यांपेक्षा मनःपूर्वक स्वागताचा गोंधळ तो समजून घेतो…
तो खराखुरा आहे
[…]
पावसावरची ही चारोळी प्रातिनिधिक आहे. कृपया माझ्या या पहिल्या प्रयत्नासाठी आपल्या काही सूचना किंवा काही प्रतिक्रिया असतील तर त्या स्वागतार्ह आहेत.
[…]
अखेर रामदेवबाबांना अटक करून त्यांचे आंदोलन चिरडण्यात सरकार यशस्वी झाले. लोकशाहीचा उदोउदो करणाऱ्या कोंग्रेस सरकारला लोकशाहीचाच खून पाडण्याचे आदेश देताना जराही लाज वाटली नाही. मध्यरात्री उशिरा सगळा देश आणि मिडिया झोपेत असताना दिल्ली पोलिसांनी ही कारवाई केली. अर्थातच दिल्ली पोलिसांनी ही कारवाई स्वतः केली असे म्हणणे हास्यास्पद ठरेल. बराच खल करून अशी कारवाई करण्याचे आदेश पंतप्रधान मनमोहनसिंग व कोंग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिले होते असा विरोधकांचा आरोप आहे.
[…]
१८ मे हा मराठवाडा कृषी विद्यापीठाचा वर्धापन दिन. १९७२ साली परभणी येथे या विद्यापीठाची स्थापना झाली. मराठवाड्यातील शेती व अनुषंगिक व्यवसायातील समस्या दूर करण्यासाठी संशोधन करणे, कृषी खाते तसेच इतर विकास खात्यातील विस्तार कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन पथदर्शक विस्तार कार्य करणे आणि कृषी विकासासाठी प्रशिक्षीत मनुष्यबळ निर्माण करणे ही तीन प्रमुख उद्दिष्टे विद्यापीठ स्थापनेमागे होती.
[…]
झुर्कावाल्याची व्यथा ही एक काल्पनिक व्यथा मांडली आहे. तरी गैरसमज नसावा ! […]
जगभरातील ‘वनांचे संवर्धन, शाश्वत व्यवस्थापन आणि विकास’ याबाबत जन जागृती करण्याच्या उद्देशाने संयुक्त राष्ट्र संघाने २०११ हे वर्ष ‘जागतिक वन वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. ‘लोकांसाठी वने’ ही संकल्पना यासाठी तयार करण्यात आली आहे.
[…]
अत्यंत अवघड आणि प्रतिष्ठेच्या परिक्षेचा म्हणजेच केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या नागरी सेवा परिक्षेचा निकाल बुधवारी जाहीर झाला. . . या परिक्षेत देशभरातील ९२० विद्यार्थी यशस्वी ठरले. त्यापैकी सुवर्ण महोत्सवी वर्षात, राज्यातील ९० उमेदवारांनी मराठीचा झेंडा फडकावीत व अभिमानाने सांगितले ! . . . मराठी पाऊल पडते पुढे . . .
[…]
पुणे मुंबई प्रवास करणार्या प्रत्येकाच्या मनाचा एक कोपरा दख्खनच्या राणीने व्यापलायं. दख्खनची राणी हे बिरूद मिरविणारी मुंबई-पुणे डेक्कन क्वीन आज (१ जून २०११ रोजी) ८१ वर्षांची झाली…कोळशाच्या जागी विजेवर धावणारे इंजिन जोडण्यात आले, प्रवासी संख्येबरोबर डब्यांची संख्या वाढत गेली, रंगसंगती बदलली.. आणि दिवसेंदिवस ही दख्खनची राणी तरूणच होत गेली…
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions