महामार्ग बनलेत मृत्यूचे सापळे
सध्याच्या वेगवान युगात वाहतुकीचे महत्त्व लक्षात घेऊन रस्ते सुधारणांवर भर दिला जात आहे. शिवाय प्रशस्त रस्त्यांची बांधणीही केली जात आहे. तरीही वाहतूक खात्याचे दुर्लक्ष आणि वाहतुकीच्या नियमांचे पालन न करण्याची चालकांची प्रवृत्ती आदी कारणांमुळे रस्त्यांवरील अपघातांची संख्या वरचेवर वाढत आहे. परिणामी, हे रस्ते मृत्यूचे सापळे बनत आहेत. ही परिस्थिती कोण आणि कशी बदलणार हा खरा प्रश्न आहे.
[…]