राडियागेट आणि काही प्रश्न
एरवी सगळीकडे मिरवणार्या आणि जमिनीपासून दोन बोटे वर चालणार्या मिडियालाही या सरकारबाह्य सत्ताकेंद्राचा तपास करावा असे का वाटले नाही? खा-उ-जा (खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण) हे परवलीचे शब्द बनलेल्या आपल्या देशात लॉबिंग करुन आपले उखळ पांढरे करुन घेणे हीच आपल्या विकासाची व्याख्या झाली आहे का? आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे या देशातील तथाकथित बोलघेवड्या मध्यमवर्गाने आजतागायत यापैकी एकही प्रश्न कसा उपस्थित केला नाही?
[…]