नवीन लेखन...

नागली

नागली म्हणजेच नाचणी. नागली अथवा नाचणी हे भारतात अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. भारतात सर्व भाषेत नागली अथवा नाचणी असेच म्हणतात. इंग्रजीमध्ये याला रागी अथवा मिलेट असे म्हणतात. नाचणी हे सर्व भारतातच नाही तर सर्व जगभर मिळते. थोडक्यात हे गरिबांचे अन्न म्हणून वापरतात. भारतातील शेतकरी व लोक नाचणीची भाकरी करतात. […]

सुरण

सुरण याला इंग्रजीत याम म्हणतात तर आयुर्वेद याला अर्शघ्न असे म्हणतात. अत्यंत गुणकारी व पौष्टिक आयुर्वेदात याचे वर्णन करतात. यात काय नाही जे जे पाहिजे ते सर्व यात आहे. मात्र सर्वात जास्त सुरणात होणारे गुण म्हणजे मूळव्याधापासून मुक्तता. सुरण कोणत्याही प्रकारे म्हणजे उकडून अथवा तुपात तळून अशा प्रकारे सुरणाचा वापर करता येतो. […]

हिवताप (मलेरिया)

हिवताप एक अत्यंत जुनाट रोग जो सबंध भारतामध्ये पसरलेला आहे. भारतापासून ते थेट आशिया खंडातही तो मोठ्या प्रमाणात दिसून येतो. एवढेच नव्हे तर चीन, युरोपमध्येही मलेरियाचा प्रभाव जास्त आहे. अनेक देशात मलेरियाला औषध सापडत नव्हते. अनेक शास्त्रज्ञांनी बरेच फिरून मलेरियाचा शोध लावण्याकरीता प्रयत्न केले. तसेच साधारण १७व्या शतकात पेरू या देशात एक झाडाचे साल सापडले. यावर प्रक्रिया करताना साल पाण्यात उकळून त्याचा रस पिण्याकरिता रोग्याला दिल्यास नक्कीच आराम वाटतो. […]

आता खेड्याकडे चला

मी एकदा ठाणे इंडस्ट्रीअल विंग या संस्थेतर्फे एक सहलीकरिता जात होतो. सर्व सभासद मिळून दोन खासगी बस तयार केली. त्यावेळेस माळशेज घाट हा फार प्रसिद्ध होता. आम्ही ठाणे, कल्याण मुरबाडने थेट माळशेज मार्गानी जुन्नरपर्यंत जावयाचे ठरले होते. त्याप्रमाणे सकाळी ५ ते ६ ।। वाजता आम्ही निघालो होतो. ठाणे, कल्याण, मुरबाड करीत आम्ही माळशेज घाटाला जाता जाता खूप बस अत्यंत धीम्या गतीने जात होती. आणि शेवटी थांबली. […]

कुटुंब समृद्धी बाग आणि राहाणीमान

कुटुंब’समृद्धी बागेमुळे आपले घर व परिसर आकर्षक दिसतो. कुटुंबाचे आहार पोषण मूल्य सुधारते. जेवण रुचकर होते. शेतीच्या उत्पादनात चढउतार आले तरी कुटुंबाच्या आर्थिक स्थितीवर त्याचा अनिष्ट परिणाम होत नाही. […]

लहान मुले अथवा ज्येष्ठ नागरिकांचे पाय दुखणे

लहान मुले म्हणजे साधारणपणे ८ ते १० वर्षे असताना कुठेही हिंडावे फिरतात. परत शाळेतील आपला अभ्यास संपवून खेळावयास जातात व सतत हुंदडत असतात. जेवण झाल्यावर सगळे काम अथवा जाग येताना आईचे काम करीत बाळ मोठ्याने ओरडत असते. आई माझे पाय वळत असतात, असे सांगून मोठ्याने ओरडत असते किंबहुना रडतसुद्धा असतो. आई बिचारी मुलांना जवळ ठेवून सतत पाय चेपत असते. […]

भारताचे तेरावे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी.

भारताचे तेरावे राष्ट्रपती अशी ओळख असलेल्या प्रणव मुखर्जी यांची कारकिर्द आदर्शवत अशीच आहे. माध्यम क्षेत्रातील एका खासगी पत्रिकेच्या सर्वेक्षणानुसार जगातील सर्वोत्तम अर्थमंत्री म्हणूनही त्यांना गौरवण्यात आले आहे. […]

स्वच्छतेसाठी साबणाची गरज

पुष्कळ वेळा पुरेसे पाणी वापरूनही कपड़े स्वच्छ होत नाहीत. आपण त्या वेळी साबणाचा उपयोग करतो. कपडे स्वच्छ करण्यामध्ये साबण नेमकं काय करतो? आपल्या शरीरातून व केसांमधून घामाबरोबर तेलकटपणा किंवा स्निग्धांश बाहेर पडतो. शिवाय आपण तेल, व्हॅसलिन वापरतो. आपल्या खाण्यामध्ये लोणी, तूप, तेल हे पदार्थ असतातच. […]

गोरं करणारा साबण

गोरं करणाऱ्या क्रीम आणि गोरं करणाऱ्या साबणांचा खप फार मोठ्या प्रमाणात होतो. त्वचेला रंग कशामुळे येतो? आपल्या त्वचेमधील मेलेनॉसाइट पेंशींमधून स्त्रवणाऱ्या मेलॅनिन या रंगद्रव्यामुळे त्वचेला रंग प्राप्त होतो. खरं तर याच मेलॅनिनमुळे आपल्या त्वचेला अतिनील किरणांपासून सुरक्षा मिळते म्हणूनच शास्त्रीयदृष्ट्या सावळी त्वचा असणं ही एक निसर्गाने आपल्याला दिलेली भेट आहे. […]

साबण आणि डिटर्जंट यांतील फरक

डिटर्जंट आणि साबण ( तेल वापरून बनवलेले) यांमध्ये रासायनिकदृष्ट्या काहीच साम्य नाही. डिटर्जंटमध्ये तरीदेखील साबणाचे बरेचसे गुण आढळतात, ते कसे? डिटर्जंट म्हणजेच कार्बनीद्रव्य (पेट्रो-रसायने) असलेले संश्लेषित पदार्थ. साबणाच्या रेणूप्रमाणे डिटर्जंटच्या रेणूच्या कार्बनी मूलकाच्या एका टोकाचा भाग ‘जलरोधी’ तर दुसऱ्या टोकाकडील भाग ‘जलप्रेमी’ असतो. अशाप्रकारचे रेणू पाण्याचा पृष्ठीय ताण करतात. कमी त्यामुळेच डिटर्जंटमध्ये साबणाचे गुणधर्म येतात. साबणाशी तुलना करता डिटर्जंट हे अधिक कार्यक्षम आहेत. यामागे काय कारण असेल? […]

1 17 18 19 20 21 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..