Articles by मराठीसृष्टी टिम
युडीआरएस : तंत्रज्ञान की अचूकता ?
मैदानावरील पंचांचा एखादा निर्णय चुकल्यास खेळाडूंना त्याविरुद्ध तिसर्या पंचाकडे दाद मागता येते. युडीआरएस या पद्धतीत हे शक्य आहे. आयसीसीने ही पद्धत वापरायचे ठरवले असले तरी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा युडीआरएसला ठाम विरोध आहे. खेळाडूंमध्येही या पद्धतीबद्दल अनेक मतभेद दिसून येत आहेत. शेवटी ही पद्धत किती अचूक ठरेल यावरच तिचे भवितव्य अवलंबून आहे.
[…]
निर्व्यसनी
लग्न जमवण्याच्या बैठकीतील संवाद;
मुलाचे मामा : मुलगा एकदम निर्व्यसनी आहे बरं का. सुपारीचे खांड
सुद्धा खात नाही.
[…]
खेळ खातेवाटपाचा
नव्या मंत्रिमंडळाच्या स्थापनेचा मुहूर्त निश्चित झाला की त्यातील खात्यांविषयी स्पर्धा सुरू होते. मंत्र्यांच्या दृष्टीने विशिष्ट खाती खास महत्त्वाची असतात. अशी खाती निधीचा मोठा ओघ असणारी असतातच पण मलिदा खाण्यासाठी सहाय्यभूत ठरतात. त्याच वेळी मंत्रिमंडळात नाईलाजाने घ्यावे लागलेल्यांच्या पदरी ‘उपेक्षित’ खाती टाकली जातात. असा हा खातेवाटपाचा खेळ नेहमीच रंगत राहतो.
[…]
कुठे आहेत स्त्रियांच्या चळवळी ?
मुंबईतील पोलिस निरीक्षकाने अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्काराची घटना चर्चेत आहे. आता तर नूतन उपमुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याने तपासकार्यावरील दबाव वाढला आहे. वास्तविक कायद्याच्या रक्षकानेच जनतेचे शोषण केल्यास त्यांना अधिक कडक शासन व्हायला हवे. शिवाय स्त्रियांच्या तसेच युवकांच्या सामाजिक चळवळींबरोबरच पुरुषांना स्त्री दाक्षिण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे.
[…]
गांधीविचारांची मार्मिक मिमांसा
महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांनी लिहिलेल्या ‘लेट्स किल गांधी’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद नुकताच बाजारात आला. या पुस्तकाच्या निमित्ताने गांधीहत्येचे कारस्थान, घटनेचा तपास आणि खटल्याविषयीच्या नोंदी तपशिलाने पुढे आल्या आहेत. या नोंदी मांडताना लेखकाने गांधीजींच्या शेवटच्या दिवसातील घटना मांडताना त्यांच्या विचारांचीही मार्मिक मिमांसा केली आहे.
[…]
पर्याय अॅसेट अॅलोकेशन फंड्सचा
भविष्यात लागणार्या निधीची गरज ओळखून त्याप्रमाणे आजच विविध पर्यायांमध्ये गुंतवणूक करण्याला अॅसेट अॅलोकेशन म्हणतात. पण, अॅसेट अॅलोकेशन करणे तेवढे सोपे नसते. अशा वेळी अॅसेट अॅलोकेशन फंड्स आपल्या मदतीस येतात. यात गुंतवणूकदाराला फारसा विचार करावा लागत नाही. त्यांच्या गुंतवणुकीचे निर्णय तज्ज्ञांद्वारेच घेतले जातात. असे असले तरी काहींचा या फंड्सना विरोध आहे.
[…]
सहकारातही हवा माहिती अधिकार
माहिती-अधिकाराच्या कायद्यामुळे विविध क्षेत्रातील गैरव्यवहार, फसवणूक आदींवर अंकुश ठेवण्यात यश येत आहे. पण, या कायद्याच्या कक्षेत येत नसल्याने सहकार क्षेत्रातील वाढत्या गैरव्यवहारांना आवर घालणे कठीण ठरत आहे. या पार्श्वभूमीवर सहकार क्षेत्र माहिती अधिकाराच्या कक्षेत आणण्याबाबत विचार करावा ही मुंबई उच्च न्यायालयाने केलेली सूचना महत्त्वाची मानायला हवी.
[…]
सार्वजनिक वाचनालयांचे साहित्य प्रसारातील योगदान आहे का? वाचनालये लोकांपर्यंत पोहोचण्यात अपुरी पडत आहेत का?
दरवर्षी होणार्या साहित्य संमेलनामधील एक लोकप्रिय घटक म्हणजे विविध परिसंवाद. या परिसंवादांमध्ये वक्ते बोलतात.. श्रोते ऐकतात. पण श्रोत्यांना आपली मतं मांडण्याची संधीच कुठे उपलब्ध नसते. आपल्याला असं नाही का वाटत…. आपल्यालाही इथं संधी मिळावी? अनेकांना वाटतंही. पण सांगणार कोणाला?
प्रत्यक्ष संमेलनाच्या व्यासपीठावर नाही तर नाही.. पण निदान आपल्या मराठीसृष्टीद्वारे हजारो वाचकांपर्यंत ही मतं मांडण्याची सोय आता उपलब्ध आहे. आपली ही मतं आम्ही थेट पोहोचवणार आहोत संमेलनाच्या आयोजकांपर्यंत.. आणि पर्यायाने या परिसंवादांच्या वक्त्यांपर्यंतही…
[…]
मराठी माध्यमात शिकल्याने काय कमावले? न शिकल्याने काय गमावले?
ठाणे येथे डिसेंबर २०१० मध्ये होत असलेल्या ८४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एक परिसंवाद होणार आहे. आपलेही या विषयावर काही मत असेल आणि आपल्यालाही ते लोकांसमोर मांडायचे असेल. ही सोय आता आपल्याला उपलब्ध आहे. आपले मत खुशाल मोकळेपणाने मांडा. ते परिसंवादाच्या वक्त्यांपर्यंत पोहोचवले जाईल.
[…]