लग्नाचा बस्त्याची खरेदी करण्यापूर्वी……………………..
चला कुठे पैसे आपल्याला द्यायचे म्हणून दोनही घराची मंडळी दाबून खरेदी करतात आणि रुपये १०००० मालाचे २०००० देऊन येतात
[…]
चला कुठे पैसे आपल्याला द्यायचे म्हणून दोनही घराची मंडळी दाबून खरेदी करतात आणि रुपये १०००० मालाचे २०००० देऊन येतात
[…]
म्हणजे आपण लिहितो १२०२३४३२ आणि याला जर कॉमा लावला तर हि सख्या दिसतांना अशी दिसेल १२,०२३,४३२.०० आणि आपल्याला हवी असते भारतीय पद्धत म्हणजे १,२०,२३,४३२.००
[…]
राज्यातील साखर कारखानदारी सतत चर्चेत असते. विशेषत: आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या साखर कारखान्यांना सरकारकडून दिल्या जाणार्या कोट्यवधींच्या मदतीबाबत उलटसुलट मते व्यक्त होतात. या पार्श्वभूमीवर साखर उद्योग नियंत्रणमुक्त करण्याच्या मागणीने जोर धरला आहे. पण, इतर बाबतीत खासगीकरणाचे धोरण स्वीकारणारे सरकार सत्तास्वार्थासाठी या उद्योगाला नियंत्रणमुक्त करू इच्छित नाही.
[…]
राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयोजनातील भ्रष्टाचाराची नव्याने चर्चा सुरू झाली. त्यातच एका पक्षाचे असूनही शीला दीक्षित आणि सुरेश कलमाडी या भ्रष्टाचाराबाबत एकमेकांवर आरोप करत आहेत. अनेकांना हे प्रकरण आयपीएलसारखे बाष्पीभूत होईल का, अशी शंका भेडसावत आहे. आयपीएल प्रकरणात ललित मोदींचे कोंबडे कापून सत्तेच्या देवीला शांत करण्यात आले. राष्ट्रकुल प्रकरणात फार तर कलमाडींचा ललित मोदी होईल असे दिसते.
[…]
राज्यात काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या निवडीच्या चर्चेने वेग घेतला आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात ही निवड निश्चित होईल असे दिसते. मुख्य म्हणजे आपल्याला हवी ती व्यक्ती प्रदेशाध्यक्षपदी विराजमान व्हावी यासाठी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि केंद्रातील मंत्री विलासराव देशमुख हे दोघेही कसून प्रयत्न करत आहेत. ही त्यांच्यासाठी एकमेकांवर कुरघोडी करण्याची नामी संधी आहे. यात कोण बाजी मारतो हे पहायला हवे.
[…]
शिक्षणास आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास उत्पादन आणि उत्पन्नात भरीव वाढ करता येऊ शकते याचे उत्तम उदाहरण जालना जिल्ह्यातील नंदापूर येथील रहिवासी दत्तात्रय भानुदास चव्हाण यांनी घालून दिले आहे. बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यावर श्री. चव्हाण यांनी फळबाग आणि भाजीपाला पदविका मिळविली. पदविका घेत असतानाच ते खरपुडी येथील कृषि विज्ञान केंद्राचे सदस्य झाले आणि कृषिविषयक माहिती घेऊ लागले.
[…]
योग्य साठवणुकी अभावी लाखो टन अन्नधान्य वाया जाण्याच्या घटना देशात अनेकदा घडतात. त्यासंदर्भात सरकारवर तसेच कृषी खात्यावर वेळोवेळी ताशेरेही झाडण्यात आले आहेत. तरीही धान्य साठवणुकीचा महत्त्वाचा प्रश्न दुर्लक्षित आहे. खरीप हंगामात झालेले अधिक उत्पादन आणि रब्बीतील उत्पादनवाढीची शक्यता लक्षात घेता अजून तरी शासनाने साठवणुकीबाबत काही ठोस निर्णय घेतल्याचे दिसत नाही.
[…]
भारतीय संस्कृतीत विवाहसंस्थेला विशेष महत्त्व आहे. पण, आता बदलत्या काळानुसार ‘लिव्ह इन रिलेशनशीप’लाही समाजमान्यता मिळाली आहे. अशा नात्यात एकत्र राहण्यासाठी तसेच वेगळे होण्यासाठी ही कोणाच्या परवानगीची गरज नसते. पण, विभक्त झाल्यानंतर स्त्रीला पोटगी मिळावी, घरगुती हिंसाचार कायद्यानुसार तिला संरक्षण मिळावे तसेच अपत्यांची जबाबदारी कोणी घ्यावी यावर सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच भाष्य केले.
[…]
‘आपण शिवसेनेत ठाकरे कुटुंबाला लादत नसतो’ असे म्हणत सेनाप्रमुखांनी नातू आदित्यला शिवसेनेचा पुढील वारसदार म्हणून पेश केले. त्यामुळे शिवसेनेतील घराणेशाहीविषयी चर्चा सुरू झाली. अलीकडे प्रत्येक पक्षात घराणेशाही दिसते. काँग्रेसने तर ही परंपरा आजवर जपली. आश्चर्य म्हणजे घराणेशाही आणणार नाही असे सांगणारे प्रत्यक्षात त्याचा पुरस्कार करतात. घराणेशाही ही राजकारणातील अपरिहार्य चौकट बनली आहे.
[…]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions