नवीन लेखन...

परीसस्पर्श

स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी किंवा रसिकांच्या रंजनासाठी सादर होणारी कला जेंव्हा भक्तिभावाने परमेश्वरासाठी सादर होते तेंव्हा त्या कलेच्या साधनेतून पुण्याचीच साठवण होते. शाहीर अनंत फंदी यांची अत्यंत प्रज्ञावंत, हजरजबाबी लोककलाकार म्हणून कीर्ती पसरली होती. या लावणीसम्राटाच्या अंगी जन्मजात कवित्व होते. गावोगाव ते आपली कला सादर करीत. असेच एकदा माळव्यात ते आपला फड घेऊन गेले होते तेंव्हा त्यांच्या […]

माझे सूचीलेखन कार्य

१९७८ साली मी पीएच. डी. पदवी मिळवली. त्यानंतर काही दिवसात मला मराठी विभागाचे पत्र आले. विभागाने वाड़्मयीन नियतकालिकांवर एक प्रकल्प घेतला होता. त्या आधी पुष्पा भावे यांनी ‘विविधज्ञानविस्तार’ या एकोणिसाव्या शतकातील नियतकालिकावर पीएच. डी. पदवीकरिता प्रा. अ.का. प्रियोळकर यांच्याकडे नाव नोंदवले होते आणि त्या नियतकालिकामधील लेखांची सूचीही केली होती. […]

चित्रकलेचा हात

मला चित्रकलेची आवड लहानपणापासून होती. मी दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत जात होते. घर शाळेच्या अगदी जवळ असल्यामुळे आमचे चित्रकलेचे सर मला सुस्वागतमची रांगोळी काढायला बोलवत असत. त्यांचा मला जास्त सहवास मिळायचा व ते मला चित्रकलेबद्दल बरेच सांगायचे. आमच्या शाळेत प्रत्येक वर्गाचं दरवर्षी एक मासिक काढलं जायचं, त्याचं मुखपृष्ठ नेहमी मीच काढत असे. […]

नाट्यक्षेत्राने केले माझे जीवन समृद्ध

माझा मोठा भाऊ सुरेश त्याच्या दोन मित्रांना घेऊन कुठल्यातरी नाटकातले संवाद सादर करायचा. घरातल्या हॉलमध्ये आईच्या काही नऊवारी साड्या किंवा रोज वापरायच्या चादरी इकडे तिकडे लटकावून त्यांचं स्टेज तयार व्हायचं. आम्ही बाल गोपाळ , मित्रमंडळी हे सगळे त्यांचे प्रेक्षक असायचो. […]

अनुभवांचे शब्द जाहले

मला आजही लख्खं आठवतंय, आजीचं एक पालूपद …. तुला “अनुभव” येईल नं तेव्हां कळेल. मी म्हणायची, ‘आजी कुठून ग येईल तो अनुभव ?’
‘अगं, तो काही असा सांगून येत नाही वेडाबाई. तुझं तुलाच जाणवेल हो.’ […]

जातिभेदाला पहिली थप्पड

जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव-बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खाणवळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन-चार जुन्यांतली जुनी भंडारी हॉटेले कोटांत नि गिरगांवात अजून चालू आहेत. भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची. […]

अनुभव वास्तुतज्ज्ञाचे

व्यवसायातले अनुभव म्हणजे एक प्रकारचे शिक्षणच आहे. म्हणतात ना, अनुभवातून माणूस शिकतो, सावरतो, कधी शहाणपण येते तर कधी सर्किटही बनतो, मात्र संवेदना जागृत होऊन सिंहावलोकन ही करता येते आयुष्याचे.. […]

करायचं आता काय ?

-विजय कुवळेकर रेडा ऱ्हायला  गाभन आनिक म्हशीनं खाल्ली हाय आक्रित आक्रित घडतंय समदं करायचं आता काय ? सांगा करायचं आता काय ? || सखे म्हनाले,” तुम्हास्नी न्हाई ठाऊक आमची पावर” “येवढं हाय तर ” म्हनलं ” हिंमतीनं गुंडान्ला घाला आवर” “कुनाला सांगतोस,बेट्या” म्हनाले ; धरून सुऱ्याचा नेम “करीन” म्हनाले,” तुमच्यासारख्या घुंगुरट्यांचा गेम ” दमच भरला त्यांनी; […]

जहाजांची दुनिया

जगात विकासाची गंगा आणली ती वाहतुकीच्या साधनांनी. म्हणून कोणत्याही अर्थव्यवस्थेचे वर्णन करताना अर्थचक्र हा शब्द वापरला जातो. चक्र है वाहतुकीचे आणि गतीचे प्रतीक होय. वाहतुकीच्या साधनांचा हा एक आढावा. […]

कुंकू – सौभाग्याच लेणं

सध्या सर्वत्र नवरात्री उत्सवाची धामधूम सुरु आहे. विविध देवतांची देवळं गर्दीने ओसंडून वाहात आहेत. चौका चौकातून देवीची स्थापना करून आरास व रोषणाई यामुळे लाखो रुपयांचा चुराडा होत आहे. तासनतास स्त्रिया दर्शनासाठी रांगेत नटून उभ्या आहेत. सवाष्णी पूजन हळदी-कुंकू समारंभ उत्साहाने साजरे होत आहेत मात्र सवाष्णी पूजन, व हळदी कुंकू समारंभ यातून विधवा स्त्रिया मात्र चार हात लांबच आहेत. […]

1 2 3 4 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..