इंग्रजी शाळांची मनमानी
नुकताच मुंबई उच्च न्यायालयाने एक निर्णय देऊन सरकारला शाळांची फी निश्चित करता येणार नाही असे सांगितले. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे बर्याच इंग्रजी शाळांनी फी वाढ केली व त्यामुळे पालकांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला. पण अर्थातच अनेक शाळांनी याला भीक घातली नाही. त्याचप्रमाणे काही ठिकाणी पालक पाल्याच्या भवितव्याच्या काळजीने गप्प बसले. पण एकंदरीतच मुलांच्या शिक्षणाचा खर्च हा प्रश्न या निमित्ताने ऐरणीवर आला आहे.
[…]