विश्वसुंदरीच्या बुद्धिसौंदर्याची चुणूक
लास व्हेगासमध्ये पार पडलेल्या ‘मिस युनिव्हर्स २०१०’ स्पर्धेच्या झगमगत्या सोहळ्यात मेक्सिकोच्या जेमिना नवारते विश्वसुंदरी ठरली. ८३ स्पर्धकांना मागे टाकत आत्मविश्वास, जिद्द, चुणूक, सौंदर्य आणि बुद्धिचातुर्य या निकषांवर सरस ठरत नवारतेने बाजी मारली. या आधी तिने २००९ मध्ये ‘न्युएस्ट्रा बेलेझा मेक्सिको’ ही स्पर्धा जिकली होती. ‘मिस युनिव्हर्स’चा किताब जिकल्यानंतर नवारतेचा आनंद गगनात मावत नव्हता.
[…]