देव नव्हे मित्र !
साध्या रुपातला मनमोहक, सोज्ज्वळ गणू मला भावतो. तो माझ्यासाठी आशीर्वाद देणारा देव नसून म्हणणं ऐकून घेणारा जीवलग सखा आहे. त्याच्या उदारपणामुळेच आपण त्याच्यासमोर नतमस्तक होतो. आजकाल गणेशोत्सवाचं स्वरुप खूप पालटलं आहे. त्याबद्दल खूप दु:ख वाटतं. प्रत्येकाने गणेशोत्सव स्वत:च्या स्वार्थासाठी नव्हे तर श्रद्धेने आणि भक्तीभावाने साजरा करावा असं मला वाटतं.
[…]