नवीन लेखन...

भारताचे दहावे राष्ट्रपती के. आर. नारायणन

के. आर. नारायणन यांना केवळ देशातच नव्हे तर विदेशातही अनेक मानसन्मान मिळाले. साहित्यातही त्यांची विशेष रुची होती. शालेय स्तरापासूनच त्यांनी विशेष श्रेणी मिळवली होती. परिवारातील बंधूत त्यांचा चौथा क्रमांक होता. […]

पान खाल्ल्यामुळे कॅन्सर होतो का?

पानाचा विडा तयार करण्यासाठी नागवेलीचं पान वापरलं जातं. या पानावर चुना आणि काथ लावला जातो. त्यावर सुपारी ठेवून पानाची पुडी केली जाते. यात आवडीनुसार लवंग, वेलची, गुंजेची पानं, गुलकंद, तंबाखू इत्यादी पदार्थ टाकतात. पण विड्यात नागवेलीच्या पानाबरोबर काथ, चुना आणि सुपारी हे पदार्थ मात्र हवेतच. पानात जे इतर पदार्थ टाकले जातात, तसंच पान कोणत्या प्रदेशातलं आहे, त्यावरून त्या विड्याला नाव दिलं जातं. उदा. मघई, बनारसी, कलकत्ता, पूना इत्यादी. […]

ई-कोलाय

माणसाच्या शरीरात अनेक जिवाणू म्हणजे बॅक्टेरिया असतात. सगळेच जिवाणू हे घातक नसतात, तर काही मानवाचे मित्रही असतात. ई-कोलाय या जिवाणूचे मात्र तसे नाही. तो आरोग्यास घातक असतो, पण त्याच्या सगळ्या जाती या हानिकारक नाहीत. त्याचा शोध जर्मनीतील बालरोगतज्ज्ञ थिओडोर इशरिच यांनी १८८५ मध्ये लावला. […]

पाणी ‘वैश्विक द्रावक’ का आहे?

नाना तऱ्हेचे पदार्थ पाण्यात सहजतेने विरघळतात, कारण पाणी एक उत्तम द्रावक आहे. शास्त्रीय भाषेत ज्या द्रावणात आम्लधर्मी आणि आम्लारीधर्मी असे दोन्ही पदार्थ विरघळतात त्याला (सार्वत्रिक) वैश्विक द्रावक म्हणतात. पाणी हे वैश्विक द्रावक आहे. याचे कारण पाण्याच्या रेणूत दडलेले आहे. […]

अमायनो ॲसिड

अमायनो ॲसिड साठवता येत नाही, हा अतिशय महत्त्वाचा शोध होता. डॉ. रोज याप्रमाणे नेहमी अमायनो ॲसिड शोधून त्याला नाव दिले. लेओनिन यांनी त्याला नाव दिले इसेंशियल अमायनो ॲसिड. असे डॉ. रोज यांनी पहिल्या प्रथम दहा अमायनो ॲसिड आणि त्याला विशेष नाव दिले. आता यात काही अमायनो ॲसिड बाहेरूच घ्यावी लागतात. […]

कोकम

कोकणातील एक सर्वांत चांगले थंडपेव म्हणजे कोकम सरबत. ते आता शहरातही लोकप्रिय झाले आहे. कोकाकोला किंवा इतर शीतपेयांमध्ये शरीराला फार हानी होते तशी कोकम सरबतामुळे होत नाही. […]

कोवळ्या पानांचा लाल रंग

पान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हिरव्या रंगाचं पान येतं. पण तुम्ही निरीक्षण केलं आहे का? आंबा, पिंपळासारख्या झाडांची पानं कोवळी असताना लाल असतात. नेहमी हिरवी असणारी पानं कोवळी असताना लाल का दिसतात? पानाला हिरवा रंग येतो ते त्याच्यात असलेल्या हरितद्रव्यामुळं, पण फक्त वनस्पतीत रंगाचेच हिरव्या रंगद्रव्य असतं असं नाही. […]

नीरा

सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे निदान पुण्यासारख्या ठिकाणी तरी नीरा हे थंड पेय घेतल्याशिवाय अनेकांना चैन पडत नाही. सांगून गंमत वाटेल, पण पूर्वीच्या काळात नीरा हे पेय निषिद्ध मानले जात असे. याचे कारण नीरा म्हणजे दारू असते असेच मानले जात असे. त्यामुळे काही लोक लपूनछपून नीरा पीत असत. […]

कुटुंब समृद्धी बाग

आपल्याकडच्या बहुसंख्य शेतकऱ्यांचं उत्पन्न जेमतेम कसंबसं जगण्याइतकंच असतं. त्यातच अलीकडे वाढलेले उत्पादन खर्च, शेतमालाला मिळणारे कमी भाव, यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत खालच्या पातळीवर पोहोचलेली दिसते. साहजिकच शेतकरी व त्याच्या कुटुंबीयांना आधुनिक आहारपद्धतीत तज्ज्ञांनी शिफारस केलेले अन्नघटक तसेच पोषणमूल्येही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकरी कुटुंबांत कुपोषण वाढून त्यांचे आरोग्यमान दिवसेंदिवस ढासळत चालले आहे. […]

पोटॅशियम

लहान मुले अथवा ज्येष्ठ नागरिक यांचे पाय का दुखतात. पोटॅशियम याला मराठीत पालाश म्हणतात. पोटॅशियम, सोडियम, जस्त, तांबे, मॅग्नेशियम, मॅगेनीज यांनी खनिज द्रव्ये असेही म्हणतात. ही खनिज द्रव्ये आपल्या स्नायू व हाडे यांच्यापासून मिळतात. सर्व खनिज द्रव्ये आपल्या सर्व अन्नातूनच मिळतात. जेवण झाल्यावर रूधिराभिसरण झाल्यानंतर ही सर्व खनिज द्रव्ये आपल्या रक्तात मिसळतात. पोटॅशियमचा मुख्य हेतू म्हणजे याची सर्व स्नायू बळकट होतात. […]

1 19 20 21 22 23 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..