नवीन लेखन...

“इको व्हिलेज”

सोमवार, ३० ऑगस्ट, २०१०महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यातील गावांचा शाश्वत विकास घडवून आणण्याकरिता शासनाने ग्रामोत्थानाचा त्रिसूत्री कार्यक्रम राबविण्याचे ठरविले आहे. या योजनेला ‘इको व्हिलेज’ नाव दिले असून १० हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असणार्‍या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ३६ लाख रुपयांचा निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.’इको व्हिलेज’ योजनेंतर्गत गावांमध्ये उच्चप्रतीच्या भौतिक व मूलभूत सुविधा तसेच दर्जेदार […]

शेतकर्‍यांनी तयार केली पाण्याची बँक

सातारा तालुक्यात धावडशी हे छोटेसे गाव आहे. या गावातील १५ शेतकर्‍यांनी एकत्र येऊन गावातील विहिरी जोडण्याचा नवा विचार मांडला. सर्वानुमते योग्य नियोजन होऊन विहिरी जोडण्याचा निर्धार पक्का झाला. पाऊसकाळात पावसाचे प्रमाण चांगले असले तरी उत्तरेकडील मेरूलिंगच्या डोंगराकडील शेती पावसाच्या पाण्यावरच अवलंबून असते. पावसाळा संपल्यावर शेतीसाठी जाणवणारे पाण्याचे दुर्भिक्ष संपविण्यासाठी या तरूणांनी विचार करण्यास सुरुवात केली. सातार्‍यातील सामाजिक कार्येकर्ते डॉ.अविनाश पोळ यांचे मार्गदर्शन त्यांना मिळू लागले. गावातील पोलीस पाटील ज्योतिराम पवार आणि त्यांच्या सहकार्‍यांनी पुढाकार घेतला आणि विहिरी जोडण्याचे काम सुरू झाले.
[…]

सुवर्णमुद्रा – लखलखती सोनेरी वाटचाल – दाजीकाका गाडगीळ

पु. ना. गाडगीळ आणि कंपनी या पुण्यातल्या सराफी पेढीचे आधारस्तंभ, नव्वदीतही तरुणाईला लाजविणारा उत्साह अंगी असणारे अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांना वाहिलेला मानाचा मुजरा म्हणजे `सुवर्णमुद्रा.’ दाजीकाकांचे नातू सौरभ गाडगीळ यांच्या आग्रहातून तयार झालेल्या उत्कर्ष प्रकाशनच्या या देखण्या पुस्तकाला शब्दसाज चढविला आहे, सहजसुंदर भाषाशैली असलेल्या मंगला गोडबोले यांनी.
[…]

पद्मविभूषण पुरस्कार

पद्मविभूषण हा भारतातील दुसर्‍या क्रमांकाचा नागरी सन्मान आहे. यामध्ये एक पदक आणि प्रशस्तीपत्र भारतीय राष्ट्रपतींच्या हस्ते दिले जाते.
[…]

“टिनएज” “लव्ह” धोकादायक

पौंगडावस्थेत (टिनऐजर्स) प्रेमाची बाधा झाली नसेल अशी व्यक्ती विरळाच म्हणावी लागेल. वयाच्या 12 ते 14 वर्षांत प्रेम ही भावना मनात जागृत होऊ लागते. आपल्या आयुष्यातील हे अपघाती वळणच असते. या वयातही हल्ली अनेक अफेअर्स होत आहेत. त्याला ‘टीनएज लव्ह अफेअर्स’ असे म्हणतात. या वयात मुले मागचा-पुढचा कुठलाच विचार करत नाही. कारण ‘लव्ह फिवर’ त्याच्या नसांनसात भिनलेला असतो.
[…]

आंधप्रदेश मराठी साहित्य परिषदेस राज्य शासनातर्फे १० लाखांची देणगी

हैदराबादच्या आंध्रप्रदेश मराठी साहित्य परिषदेस राज्य शासनातर्फे दहा लाख रुपयांची देणगी देणार असल्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
[…]

बिग मराठी म्युझिक ऍवॉर्डसमधून मराठी संगीतकार गीतकारांना प्रोत्साहन – अशोक चव्हाण

महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मराठी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी एफएम रेडिओवर मराठी गाणी ऐकविली जात असून मराठी संगीतकार, गीतकार यांना प्रोत्साहित करणार्‍या बिग मराठी म्युझिक ऍवॉर्डस् सारख्या कार्यक्रमांचे आयोजन होत आहे, ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.
[…]

इंग्रजी शिकण्याची सोपी पध्दत

कुठलीही भाषा आत्मसात करणे, म्हणजे दुसर्‍याने बोललेली किंवा लिहिलेली भाषा समजणे होय. तसेच त्या भाषेत आपल्या मनातील विचार व्यक्त करता आले पाहिजेत. एखादी भाषा शिकणे म्हणजे त्या भाषेची जाण व अभिव्यक्ती या दोन्ही गोष्ट आवश्यक आहेत. आपण आपली मातृभाषा आई-वडील, कुटूंब व शेजारी पाजारी यांच्याशी बोलून अथवा ऐकून शिकत असतो. इंग्रजीही अगदी त्याचप्रमाणे सहज शिकू शकतो.
[…]

शेंदुर्णीचे त्रिविक्रम मंदिर

मी आपल्याला खान्देशातील शेंदुर्णीला घेऊन जात आहे. येथील त्रिविक्रम मंदिराला मोठी पार्श्वभूमी आहे. श्री संत कडोजी महाराज शेंदूर्णी या पावन नगरीत वास्तव्यास होते. शिवकालीन ‍श्री त्रिविक्रम मंदिराची स्थापना कडोजी महाराजांच्या हस्ते 1744 मध्ये झाली.
[…]

1 208 209 210 211 212 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..