दारूबंदीची प्रभावी अंमलबजावणी हवी
महाविद्यालयीन तरुण-तरुणींच्या फ्रेशर्स पार्टीमुळे पुण्यात बराच गदारोळ झाला. या पार्टीत अटक झालेल्या विद्यार्थ्यांवर गुन्हे नोंदवून कारवाई सुरू झाली आहे. परंतु, त्यांच्याकडे परवाना नसतानाही मद्य पुरवणार्या मद्य विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. या व्यक्तींना शिक्षा झाल्याशिवाय असे प्रकार थांबणार नाहीत. विद्यार्थ्यांना वाचवायचे असेल तर देशभर दारूबंदीच्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी व्हायला हवी.
[…]