अभिवादन गुरूंना – (गुरूपौर्णिमा विशेष)
‘गुरुबिन मोरा कौन अधारो’ असे एक वचन आहे. गुरू हाच जीवनाचा आधार असतो हे यातून प्रतित होते. आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी गुरूची आवश्यकता असते. शिष्याच्या कल्याणाप्रती आयुष्य वेचणार्या, त्याला खर्या अर्थाने घडवणार्या गुरूंच्या ऋणातून मुक्त होणं कठीण. पण किमान कृतज्ञता तरी व्यक्त करायला हवी. त्यासाठी उत्तम मुहूर्त असतो गुरूपोर्णिमेचा. ही पोर्णिमा नवी दिशा, नवे संकेत, कृतज्ञता देऊन जाते.
[…]