कोवळ्या पानांचा लाल रंग
पान म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर हिरव्या रंगाचं पान येतं. पण तुम्ही निरीक्षण केलं आहे का? आंबा, पिंपळासारख्या झाडांची पानं कोवळी असताना लाल असतात. नेहमी हिरवी असणारी पानं कोवळी असताना लाल का दिसतात? पानाला हिरवा रंग येतो ते त्याच्यात असलेल्या हरितद्रव्यामुळं, पण फक्त वनस्पतीत रंगाचेच हिरव्या रंगद्रव्य असतं असं नाही. […]