नवीन लेखन...

अध्यात्म म्हणजे काय?

परवा शेजारचे काका कौतुकाने सांगत होते, ‘आमचा सुरेश या वयात अध्यात्माकडे वळलाय. दर मंगळवारी पाच पाच तास रांगेत उभे राहून सिध्दिविनायकाचे दर्शन घेतो.’ मी जरा विचारात पडलो. सुरेश हा कॉलेजात जाणारा मुलगा. या वयात तो अध्यात्माकडे वळलाय याचे त्याच्या वडिलांना कौतुक. दुसरा भाग म्हणजे पाच तास रांगेत उभे राहिला म्हणजे अध्यात्म केले हा एक समज. रांगेत उभे राहुन दर्शन घेणे हा ज्याच्या त्याच्या श्रध्देचा भाग. पण अध्यात्म म्हणजे काय?
[…]

साथ,सोबत संगत…

ही जपानमध्ये घडलेली अगदी खरीखुरी घटना ! एकदा तेथे एका माणसाने आपल्या घराचं नूतनीकरण करायला सुरुवात केली. असे करतना भिंत तोडून उघडायला लागते. जपानी घरांच्या भिंती लाकडाच्या बनवलेल्या असतात आणि त्यांत सहसा

पोकळी असते.
[…]

मराठी भाषा दिन

मराठी भाषा महाराष्ट्र व गोवा राज्याची राजभाषा असून सुमारे ९ कोटी लोकांची मातृभाषा आहे. मराठी भाषा कमीत कमी १००० वर्षापासून अस्तित्वात आहे. भारतीय संविधानाने मराठीला इतर २२ भाषांबरोबर अनुसूचित भाषेचा दर्जा दिला आहे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी २७ फेब्रुवारीला सर्वत्र जागतिक मराठी दिन साजरा केला जातो.
[…]

सारोळ्याचे वनपर्यटन

औरंगाबाद जिल्ह्यातील जगप्रसिध्द अजिंठा-वेरुळ लेण्यामुळे जगभरातील पर्यटक येथे मोठय़ा संख्येने भेट देतात. याचबरोबर म्हैसमाळ हेही एक थंड हवेचे ठिकाण विकसित होऊन प्रसिध्दीस आल्याने तेथेही मोठय़ा प्रमाणात पर्यटक येतात. प्रति म्हैसमाळ म्हणून सारोळा वनपर्यटन स्थळ आकारास येत आहे.
[…]

लोकसाहित्यातील अभ्यासकांना नवा आहेर

बहिणाबाई चौधरी यांच्या गीतांच्या निमित्ताने अहिराणी या खानदेशी बोलीभाषेशी परिचित झालो; परंतु ती खरी अहिराणी नसून खानदेशी वऱहाडी भाषा असल्याचे प्रा. डॉ. उषाताई सावंत यांच्या उपरोक्त शीर्षकाच्या शोधनिबंधपर पुस्तकातून आपणास ज्ञात होते. एखादी खरी व नवीन माहिती देण्याचे ध्येय या एकाच उदाहरणावरून कसे या पुस्तकास साध्य झाले आहे, ते लक्षात येते.
[…]

गिरिभ्रमण – एक सशक्त खेळ

श्री. पाळंदे तीस वर्षे गिरिभ्रमण करताहेत. उदंड अनुभवाचा इतरेजनांना फायदा व्हावा, या सद्हेतूने त्यांनी `डोंगरमत्री’चं लेखन केलं. यातील तीसही लेख अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक आहेत. गिरिकंदरामध्ये भटकण्याचा अनुभव घरबसल्या रसिकाला घेता येईल, या दृष्टीने पुस्तकाची जडणघडण डोळ्यात भरते. […]

काव्यमय व्यक्तिचित्रण

`घरीदारी’ या इंद्रजित भालेरावांच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. ही व्यक्तिचित्रे म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तींचा वेगळा परिचय देणारी आहेत. त्यांच्या गुणांनी व स्वभाववैशिष्ट्यांनी नटलेली ही माणसे जात्याच प्रसिद्ध आहेत. `घरीदारी’ :  लेखक : इंद्रजित भालेराव    

रेषालेखकाचे `सहप्रवासी’

`प्रतिभावान रेषालेखक’ असे ज्यांना विजय तेंडुलकरांनी म्हटले ते ज्येष्ठ चित्रकार वसंत सरवटे यांचे `सहप्रवासी’ हे नवे चौरसाकृती पुस्तक. मुखपृष्ठ आणि आतील एक-दोन चित्रे वगळता या पुस्तकात रेषा आहेत, त्या इतर व्यंगचित्रकारांच्या. सरवटे इथे `लेखक’ म्हणून येतात. साठ-एक वर्षांच्या त्यांच्या दीर्घ चित्रप्रवासातील सुहृदांविषयी सरवटे यांनी वेळोवेळी लिहिलेले हे लेख आहेत. […]

1 223 224 225 226 227 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..