वैद्यकीय क्षेत्रातील निर्मळ कथन
डॉ. रवी बापट यांचे नाव सुरेश भट आणि पंढरीनाथ सावंत यांच्या तोंडून वारंवार ऐकले होते. डॉक्टरांची हे दोघेही कायम स्तुतीच करीत. माझा आणि मुंबईचा तसा संबंध नाही आणि मुंबईतल्या डॉक्टरांचा तर त्याहून नाही. त्यामुळे बापट हे कोणी तरी बडे डॉक्टर आणि अधूनमधून साहित्यिकांवर उपचार करतात, असा एक समज माझ्या मनात होता. या पूर्वग्रहासह मी डॉ. बापट यांचे हे आत्मकथन वाचायला घेतले आणि डॉ. बापट यांच्याबद्दल माझे दोन मित्र जे बोलत त्यातले अक्षरही खोटे नव्हते, हे लक्षात आले. […]