व्यासंगाने घडविलेली प्रगल्भ काव्ययात्रा
डॉ. स. रा. गाडगीळ हे एक व्यासंगवेडे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांचे अवघे आयुष्य शालेय व महाविद्यालयीन स्तरावर अध्यापन करण्यात व्यतीत झाले. निर्वाहाची सक्ती म्हणून नव्हे; पण व्यासंग ही गाडगीळांची वृत्तीच आहे. अध्यापन विषय झालेले पुस्तक, ते लिहिणारा लेखक, तो वाङ्मयप्रकार यांचा सर्वांगीण अभ्यास करून त्या कोंदणात ते विशिष्ट पुस्तक बसवण्याची त्यांची सवय होती. आता `मराठी काव्याचे मानदंड’ अधोरेखित करणारे नवे विवेचन घेऊन मराठी अभ्यासकांसमोर ते आले आहेत.
[…]