प्लास्टिकच्या डब्यात खायचे पदार्थ
प्लास्टिकच्या डब्यात खायचे पदार्थ किंवा औषधे ठेवली तर ती शरीराला अपायकारक ठरतात का? हा प्रश्न वारंवार विचारला जातो. असे डबे पॉलिथिलिनपासून बनवले जातात. पॉलिथिलिन दोन प्रकारे बनवले जाते. हे दोन्ही प्रकार मुळात बिनविषारी प्रकारात मोडतात. पॉलिथिलिनचा मानवी शरीरावर अजिबात परिणाम होत नाही हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. पॉलिथिलिन हे एकमेव प्लास्टिक असे आहे की, ज्यावर कोणत्याही द्रावकाचा (सॉल्व्हंट) परिणाम होत नाही. वेगळ्या शब्दांत सांगायचे तर पॉलिथिलिन कोणत्याही द्रावात विरघळत नाही. […]