ग्रंथप्रेम – तेंव्हाचे आणि आताचे….
साहित्य संमेलन हे एक महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य आहे. ग्रंथकारांनी उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती करावी, कांनी ग्रंथ विकत घेण्याची हमी द्यावी, मराठी भाषा वीना अवगत होण्याचे प्रयत्न करावेत यासाठी न्यायमूर्ती रानडे यांनी ११ मे १८७८ रोजी प्रथम ‘ग्रंथकार संमेलन’ पुण्यात भरविले होते. हे ‘ग्रंथकार संमेलन’ म्हणजेच आताच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची आणि कालप्रवाहात निर्माण झालेल्या प्रांतिक, उपनगरीय, दलित, ग्रामीण, बालकुमार, नवोदित, होतकरू व अलिकडेच साक्री येथे झालेले दलित, आदिवासी आणि ग्रामीण संयुक्त साहित्य संमेलन या सर्वोची गंगोत्री आहे. […]