नवीन लेखन...

श्री क्षेत्र नरसोबावाडी महात्म्य

नरसोबावाडी ही साधु-संतांची तपोभूमि आहे. श्रीराम चंद्रयोगी तेथे राहिले होते. नंतर नारायणस्वामी आले. काशीकर स्वामी, गोपाळस्वामी तेथेच राहिले. येथे प्रसिद्ध मौनीस्वामी सिद्धपुरुष होऊन गेले. ब्रह्मानंद स्वामी, गोविंदस्वामी येथे रहात असत प.पू. श्रीटेंबेमहाराज येथे वरचेवर येत होते. योगी वामनराव गुळवणी महाराज दर गुरुद्वादशी वारी करीत असत. […]

इलेक्ट्रिक जनरेटर

भारनियमनाच्या काळात कुठलेही कार्यालय किंवा खादे गृहसंकुलही वीज खंडित झाल्यानंतरही प्रकाशित राहू शकते, ते इलेक्ट्रिक जनरेटरमुळे इलेक्ट्रिक जनरेटरचा आता तर आवाजही येत नाही त्यामुळे त्याला सायलंट पॉवर असेही म्हटले जाते. लेक्ट्रिक जनरेटरमध्ये यांत्रिक ऊर्जेचे रूपांतर हे विद्युत ऊर्जेत केले जाते. […]

विस्लावा सिम्बोर्सका – खर्‍या अर्थाने नोबेल कवयित्री

तिच्या कवितांमध्ये केवळ एका विशिष्ट भागाचे, भाषेचे वा स्थानिक प्रश्नांचे प्रतिबिंब पडलेले नाही; तर त्यामध्ये संपूर्ण मानवी जीवनाचे प्रतिबिंब आहे. म्हणूनच १९९६ सालचा साहित्यविषयक नोबेल पुरस्कार तिला मिळाला. या पोलिश कवयित्रीचे नाव होते विस्लावा सिम्बोर्सका. तिला नोबेल पुरस्कार बहाल करताना स्वीडिश अकादमीने म्हटले की सिम्होर्सका यांच्या कविता मानवी जीवनातील सत्याच्या इतिहासाबरोबरच जैविक संदर्भाच्या बाबतीतही तेवढ्याच महत्त्वपूर्ण आहेत. […]

स्मोक डिटेक्टर

अनेकदा विद्युत उपकरणे किंवा सिगरेट यामुळे घरात आग लागून प्राणहानी व वित्तहानी होण्याचा धोका असतो. जिथे धूर आहे तिथे आग आहे असे म्हटले जाते, त्यामुळे धूर शोधणे ही आग रोखण्यातील एक महत्त्वाची पायरी मानली जाते. अमेरिकेतील मूळ रहिवासी हे धुराच्या मदतीने संदेश पाठवित असत, पण आता आपल्याला धुरातून धोक्याचा संदेश मिळू शकतो. धूम्रशोधकाचा शोध १८९० मध्ये […]

फॅक्स मशीन

आजच्या संगणकाच्या युगातही जे जुने तंत्रज्ञान अजूनही टिकून आहे ते म्हणजे फॅक्स मशिन. ॲलेक्झांडर ग्रॅहम बेलने १८७६ मध्ये मिस्टर वॉटसन, कम हियर आय वाँट टू सी यू हे शब्द टेलिफोनवर उच्चारले, तेव्हा तो दूरसंचार क्रांतीचा पितामहच ठरला. नंतरच्या काळात याच तंत्रज्ञानाचे अनेक आविष्कार आपण पाहिले. […]

लाहोरमधील बाघ-इ-जिन्हा मैदान

बाघ-इ-जिन्हा हे पाकिस्तानातील लाहोर शहरातील एक ऐतिहासिक मैदान आहे. पूर्वी हे मैदान लॉरेन्स गार्डन या नावाने ओळखले जात असे. सध्या मात्र या मैदानाच्या आसपास विविध झाडाफुलांनी बहरलेला मोठा बगिचा आहे. तो बोटॅनिकल गार्डन म्हणून प्रसिद्ध आहे आणि शेजारी एक मशिद आहे. […]

डिजिटल घड्याळ

मनगटी घड्याळाचा शोध पॅटेक फिलीप यांनी लावला व गंमत म्हणजे त्याकाळात हे घड्याळ म्हणजे महिलांचे आवडते साधन होते. त्यानंतरच्या काळात क्वार्ट्स घड्याळे आली व कालांतराने त्यांची जागा डिजिटल घड्याळांनी घेतली. १९५६ मध्ये त्यांचा शोध लागला. […]

डिजिटल कॅमेरा

पूर्वीच्या कॅमेऱ्यात जशी फिल्म असायची तशी डिजिटल कॅमेऱ्यात नसते. यात प्रतिमा साठवण्यासाठी मेमरी डिव्हाइस असते. या कॅमेऱ्याचा फायदा म्हणजे रोल टाकण्याचा खर्च नसतो व हवी ती छायाचित्रे ठेवून बाकीची काढून टाकता येतात. पर्सनल डिजिटल असिस्टंट, मोबाईल फोन यांच्यात डिजिटल कॅमेरे असतात. […]

कोको आणि चॉकलेट

थिओब्रोमा ककॅओ नावाच्या झाडाच्या फळांमधील बिया म्हणजे कोकोच्या बिया. या झाडाच्या खोडामधून फळे येतात. चॉकोलेट हे चॉकोलेट लिकर, साखर आणि लेसिथिन व कोको बटर एकत्र करून बनवलं जातं. […]

रिमोट कंट्रोल

ज्या एका हातात मावण्यासारख्या यंत्राच्या मदतीने आपण कुठलेही इलेक्ट्रॉनिक उपकरण लांबूनच नियंत्रित करू शकतो, त्याला रिमोट कंट्रोल म्हणतात. टी.व्ही., मोबाईल फोन, मोटार, व्हिडिओ कॅमेरा, लॅपटॉप, मायक्रोवेव्ह ओव्हन अशा असंख्य साधनांचे नियंत्रण या पद्धतीने करता येते. टीव्हीचा रिमोट कुणाच्या हातात असावा यावरून तर भांडणेही होतात. थोडक्यात, हे साधन छोटे असले तरी त्याच्या अंगी नाना कळा आहेत. […]

1 33 34 35 36 37 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..