बकासुराची गोष्ट
कौरवांनी पांडवांना कुंतीसह ठार मारण्याचा प्रयत्न केला. पण ते वाचले. पांडव ब्राह्मणाचा वेश धारण करून एकचक्रा नगरीत एका ब्राह्मणाच्या घरी येऊन राहिले. कुंती व भीम घरी रहात. बाकीचे चौघे पांडव भिक्षा मागून आणीत.
ते ती भिक्षा कुंतीकडे देत. त्यातला एक भाग ती भीमाला देई आणि बाकीच्या भागात कुंती, धर्मराज, अर्जुन, नकूल आणि सहदेव आपला उदरनिर्वाह करीत. […]