वीजनिर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रचलित पद्धती
आपली विजेची गरज ही वेगवेगळ्या स्वरूपाची असते. उदाहरणार्थ, आपल्या मनगटावरच्या घड्याळातली विजेची गरज ही अत्यल्प असते व ती छोट्याशा बटण-सेलने भागू शकते. याउलट एखाद्या शहराला वीजपुरवठा करायचा असेल तर त्यासाठी मोठ्या प्रमाणावर वीज निर्माण करावी लागते. ही मोठ्या प्रमाणावरची विजेची निर्मिती मुख्यतः औष्णिक, जलविद्युत आणि अणुऊर्जा प्रकल्पांद्वारे केली जाते. […]