कचऱ्याचे व्यवस्थापन
एकूण कचऱ्यातील धूळ आणि इतर अंश सोडता जवळजवळ ८० ते ८५ टक्के भागावर परत काहीना काही प्रक्रिया करून तो पुन्हा वापरात आणता येतो. अगदी वर वर्णन केलेला ओला कचरासुद्धा. भाजी मंडईत रोज पडणारा भाज्या आणि खराब झालेल्या फळांचा भागही वापरात आणता येतो तर हॉटेलात उरलेले अन्नही खाण्याच्या नव्हे पण इतर प्रकारे उपयोगात आणता येते. […]