नवीन लेखन...

दंतमंजन किंवा मशेरी

रात्री झोपताना आणि सकाळी उठल्यावर प्रथम आपण दात स्वच्छ करतो. दातांच्या फटींत व तोंडात इतरत्र अन्नाचे कण तसेच राहू दिले, तर लाळ व उष्णता यांमुळे ते कुजू लागतात. रोगजंतूंचा प्रादुर्भाव होतो. पिष्टमय आणि गोड पदार्थांचे तोंडात राहिलेले कण आणि तोंडातील बॅक्टेरिया यापासून लॅक्टिक आम्ल तयार होते व त्याने दंतवल्कावर व (एनॅमलावर) अनिष्ट घडतो. परिणाम एनॅमलमध्ये कॅल्शियम […]

दातांच्या स्वच्छतेसाठी ‘टूथपेस्ट’

तुमच्या टूथपेस्टमध्ये मीठ आहे का? तुमच्या तोंडाला दुर्गंधी येते का? असे प्रश्न विचारत दूरदर्शनवर अनेक टूथपेस्टची जाहिरात होत असते. या टूथपेस्टमध्ये नक्की असते तरी काय? दातावरील कीट घर्षणाने सुटे व्हावे व दातांना चकाकी यावी यासाठी आवश्यक तेवढा खरखरीतपणा असलेले, बिनविषारी व रुचिहीन आणि बारीक कण असलेले पदार्थ टूथपेस्टमध्ये वापरतात. कॅल्शियम कार्बोनेट, डायबेसिक कॅल्शियम फॉस्फेट डायहायड्रेट, ट्रायकॅल्शियम […]

पांढरे शुभ्र दात

हसरा चेहरा सगळ्यांनाच प्रसन्न करतो, पण त्याबरोबर हसणाऱ्या व्यक्तीच्या दंतपंक्तीचे दर्शनही घडवत असतो. दातांवर जर डाग असतील तर एक प्रकारचा न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. बोलताना, हसताना दात दिसतील हा विचार सतत अशा व्यक्तींना त्रास देत असतो आणि मग दात शुभ्र करण्यासाठी प्रयत्न सुरू होतात. खरंतर दातांचा रंग नैसर्गिकरीत्या पांढरा शुभ्र नसतो, तो हलका पिवळसर किंवा राखाडी […]

स्टेनलेस स्टील

स्टेन म्हणजे डाग. ज्यावर डाग पडत नाहीत असे पोलाद म्हणजे स्टेनलेस स्टील. त्याच्या न गंजण्याच्या गुणधर्मामुळे स्टेनलेस स्टीलचा रासायनिक उद्योग, समुद्रातील बांधकामे, पाण्यातील बांधकामे अशा बऱ्याच उद्योगांमध्ये मोठया प्रमाणावर वापर होतो. स्वयंपाकघरातसुद्धा स्टेनलेस स्टील वापरले जाते. […]

गंजण्यापासून संरक्षण

खिळे, कुंपणाच्या तारा, विजेचे खांब या सर्व नवीन वस्तू असताना चकाकतात, पण त्या कालांतराने निस्तेज होतात आणि त्यांवर एक लाल रंगाचा थर चढतो. हा थर म्हणजे लोखंडाचे ऑक्साईड असते. […]

लोखंड व पोलाद यातील फरक

लोह हे नाव आपण १०० टक्के शुद्ध मूलद्रव्याला दिले तर लोखंड आणि पोलाद ही त्याची दोन महत्त्वाची संमिश्रे आहेत. लोह हा धातू आणि कार्बन हा अधातू यांच्या मिश्रणातून लोखंड आणि पोलाद तयार होतात. कार्बनव्यतिरिक्त या संमिश्रांमध्ये सिलिकॉन आणि मँगेनीजही असते. […]

खनिजापासून लोखंड कसे मिळवतात?

आधुनिक जगात खनिजापासून लोखंड मिळवण्याची प्रक्रिया ब्लास्ट फर्नेसमध्ये केली जाते. चित्रात दाखवलेल्या या भट्टीच्या सर्वात फुगीर भागात सर्व बाजूंनी तांब्याच्या नळ्या आत सोडलेल्या असतात. त्यातून उच्च दाबाची हवा (ब्लास्ट) आत सतत सोडली जाते. यावरून या क भट्टीला ब्लास्ट फर्नेस असे नाव मिळाले. […]

अतृप्ती

रिमझिमत्या पावसात माझ्या गर्द केसात मोगरा माळताना तू दाखवलीस स्वप्नं… रुणझुणत्या चुड्याची भरजरी शालूच्या स्पर्शाची पराक्रमी राजपुत्रानं नजर करावं गुलबकावलीचं फूल हळव्या राजकन्येला तशी अवघ्या स्वप्नांची पूर्ती झाली तुझी शपथ, तेव्हा वाटलं पायतळी मंझिल आली ! आणि मग – हातीच्या गुलाबाची पाकळी पाकळी पडावी गळून.. तसे क्षण गेले निसटून नि कसली अगम्य ओढ मनात राहिली दाटून? […]

लोखंडाचा शोध कसा लागला?

खनिजापासून लोखंड बनविण्याच्या प्रक्रियेचा विकास होण्याआधी माणसाला लोखंड माहीत होते. पृथ्वीवर सापडणाऱ्या अशनीमध्ये एक काळ्या रंगाचा धातू मिळत असे. त्या काळात इजिप्तच्या लोकांनी त्याला काळे तांबे असे नाव दिले होते. हा धातू म्हणजे लोखंड आणि ६ ते ८ टक्के निकेल यांचे संमिश्र असे. […]

धातूंचा शोध

धातू हे सामान्यपणे वातावरणात घन स्वरूपात आढळतात. त्यांचे रंग वेगवेगळे असतात, पृष्ठभाग चकाकणारा असतो, स्पर्शाला थंड लागतात, उष्णता आणि विजेचे सुवाहक असतात आणि त्यांच्यापासून पातळ पत्रे आणि लांब तारा बनवता येतात. पृथ्वीवर आतापर्यंत ८६ धातू शोधले गेले. […]

1 43 44 45 46 47 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..