मसाले: एक विश्लेषण
मसाल्यांच्या पदार्थांच्या घटकांचे विश्लेषण बघितले तर पुढील गोष्टी लक्षात येतात. मसाल्याच्या सर्व पदार्थात कॅल्शिअम व फॉस्फरस भरपूर आहेत. हाडांच्या व दातांच्या बळकटीसाठी, स्नायू आकुंचन पावण्यासाठी व मज्जातंतूंच्या कार्यासाठी व रक्त साकळण्यासाठी कॅल्शियम उपयोगी. कॅल्शियम मोठ्या आतड्याच्या कर्करोगाला प्रतिबंधक. लोह सर्व मसाल्यात विशेषतः हळद, आमचूर, हिंग, जायपत्री व जिरे यात जास्त असते. तांबड्या पेशीतील हिमोग्लोबिनसाठी आवश्यक. पंडुरोग […]