रायगडा
नको रायगडा, तू रडू नकोस कारण तुझ्या प्रत्येक उसाशातून माझी कविता जन्म घेते शिवस्पर्शाची पावन धूळ मी मस्तकी लावताना तू विषण्णपणे हसला होतास अन् काळजाला हात घातल्यागत तुझी जखम वाहू लागली तुझ्या तोंडच्या शिवकथा ऐकताना ढासळणारी मातीही जीव गोळा करुन थांबली होती गादीवरच्या खादीमध्ये गहाणलेली मराठी अस्मिता पाहून तू वेडापिसा झाला होतास तुझ्या असहाय नजरेत तरळणाऱ्या […]