एक नाटकवेडी मुलगी – (संपदा जोगळेकर – कुलकर्णी)
मी ठाण्यात जन्मले हे माझं अहोभाग्य. कारण मला कलाकार न होण्याला एकही कारण ठाण्याकडे नव्हतं, उलट ही कलावंत कशी होत नाही हे पाहणारेच अवतीभवती होते. कथ्थक नृत्यगुरू डॉ. राजकुमार केतकर. अगदी हाकेच्या अंतरावर यांचे नृत्यवर्ग. गडकरी रंगायतनसारखी वास्तू दोन मिनिटांच्या अंतरावर आणि कलासरगम, मित्रसहयोग यांसारख्या नाट्यसंस्था संधी द्यायला उत्सुक. […]