कशासाठी पोटासाठी!
‘कॉर्निश ‘ हा शब्द इथे येईपर्यंत माझ्या शब्दकोषात आलाच नव्हता. इंग्रजी/फ्रेंच भाषेतला ‘डोंगराच्या जवळून जाणारा रस्ता ‘ हा अर्थ इथे अजिबात लागू होत नाही, पण अरबी भाषेप्रमाणे जमिनीत आतपर्यंत घुसलेला समुद्राचा भाग हाच अर्थ इथेतरी जास्त योग्य वाटतो. विमानातून खाली दुबईकडे झेप घेतानाच दिव्यांच्या रेखीव चमकणाऱ्या रेघेच्या रूपात ह्या कॉर्निशची पहिली सलामी मिळते. […]