नवीन लेखन...

उपचार सारे

हात अनेक भवती एक काळजाला भिडत नाही नाती झाली उदंड, तरी जिवाभावाची साथ नाही गर्दीचे संमेलन केवढे, पण कोण कुणाला सामील नाही भेटीगाठींचा वर्षाव सारा, आतड्याला कुणाच्या पीळ नाही विलगणारे ओठ अगणित. पण हास्याची लकेर नाही बिलगणाऱ्या शरीरांचा कधी अंत:करणाला स्पर्श नाही शब्दांचा पाऊस भरपूर पण भिजलेला एकही नाही विचारांचा वर्षाव तरीही मनाला स्पर्शून नाही. आण्यांचे […]

शापित आत्मे

स्वयंप्रेरित, स्वयंप्रेषित हे सदा आपल्या जोषात आभाळओझे घेऊन खांद्यावर धावधावती कैफात नाही साथ कुणाची, नाही कसली सहानुभूती तरीही चिंता जगाची, आसक्तीची करुन सक्ती कुणी वंदा कुणी निंदा, करे कुणी वा वंचना नादावलेल्या कर्मयोग्यांची असे व्रतस्थ आराधना अशक्याचा हव्यास त्यांना, अचूकतेचा ध्यास केवढा सौख्याशी करुन वाकडे, पुकारत स्वत:शी स्वत:चा लढा आत्यंतिकाची अस्वस्थता सततच्या जणू प्रसूतिवेणा अखंड असे […]

प्रयोगशील निर्माता – शांताराम शिंदे

पहिल्या नाटकात अपयश येऊनही ते सतत नाट्यनिर्मिती करत राहिले. नवीन कलाकारांना संधी, जुन्या नाटकांचं पुनरुज्जीवन, मल्टिस्टार नाटक या आताच्या संकल्पना त्यांनी पाच वर्षांपूर्वीच वापरल्या होत्या. ‘निर्मल’ संस्थेला अनेक पुरस्कार मिळाले. पण शिंदेसाहेब कधीही पुरस्कार सोहळ्याला, पार्ट्यांना हजर राहिले नाहीत. त्यांनी स्वतला कधीही मिरवून घेतलं नाही. असा हा आगळावेगळा निर्माता 16 जुलै 2012 रोजी आपल्यातून निघून गेला. […]

हव्यास

रुसवे फुगवे, तंटे बखेडे हवे कशास लढाई झगडे अतीतटीचे हे हेवेदावे आत्यंतिक द्वेषाचा सोस कशाला? ।। आभाळाच्या मुक्ततेला नाही बंध देवाच्या मायेला ना बंधाचा गंध भिंतीआडच्या कृत्रिम जगाचा तुम्हाआम्हाला मग ध्यास कशाला ॥ जमिनीच्या हक्काच्या तुकड्याला कुंपणात जोखण्याचे ध्येय आम्हाला मुक्त हवा करुन कलुषित या छपराखाली कोंडला श्वास कशाला ॥ आयुष्याची वरात ही रिकामहाती घर भरण्याची […]

रंग अवकाशाचा मुक्तयात्री – अशोक साठे

आमच्या मेंदूच्या एका कप्यात चक्रावर्तासारखा तू का भिरभिरत असतोस? काही निमित्तांनी (आता नाट्यसंमेलन) अंधारानंतर सायक्लोरामावर पडलेल्या लख्ख पहाट प्रकाशासारखा का आठवत राहतोस? जसाच्या तसा! तुझ्याबरोबर घालवलेला प्रत्यक्ष क्षण तळहातावर स्वातीच्या थेंबाचा मोती ठेवावा, तसा मनचक्षूसमोर सजीव होऊन उलगडत राहतोस (हे जरा शब्दबंबाळ वाटतंय ना?) नाटकाची संहिता वाचताना हळूहळू अस्पष्ट, पण मग साकार दिसणाऱ्या पात्रासारखा, प्रसंगासारखा (हे तुला जवळचं वाटेल). […]

माझं गुपित

काळजाच्या डबीत, मनाच्या कुपीत जपलय् मी माझं इवलसं गुपित ॥ आहे त्याचा तर आनंद आहे नसत्याची नाही उणीव काही आनंदपरिमल दुःखाची मळमळ कुठल्या भासाची, तळमळ न ठेवत जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ १ ॥ चक्रावणाऱ्या या चक्रव्यूहातून गुदमरवणाऱ्या गाढ गर्दीतून विवंचनांच्या वावटळींमधून शहाणपण माझं आटोकाट जपत जपलय् मी माझं इवलंसं गुपित ॥ २ ॥ जीवाचा […]

।। श्री राम समर्थ ।। समर्थांचा स्त्री दृष्टीकोन व समर्थ शिष्या

“जाम समर्थ” या समर्थांच्या जन्मगावी श्रीराम मंदिर आहे. तेथे जगातील १० वे आश्चर्य अनुभवावयास येते. तेथे सीतामाई श्रीरामांच्या उजव्या बाजूस उभ्या आहेत व येवढेच नाही तर तेथे लग्नकरुन पहिल्यांदा दर्शनास आलेल्या नवरदेवाने आपल्या नवविवाहित पत्निस नमस्कार करावा लागतो हा प्रघात आहे. ही पुरुष प्रधान संस्कृतीला बगल देणारी प्रथा ४५० वर्षापूर्वी श्री समर्थांनी आपल्या राममंदिरात घालून तत्कालीन […]

आनंद माडगूळकर युट्युब चॅनेल

आनंद माडगूळकर यांच्या युट्युब चॅनेलवर गदिमांच्या अनेक किस्स्यांचा, आठवणींचा धमाल मनोरंजनाचा ठेवा उपलब्ध आहे, त्या विश्वात रमण्यासाठी आनंद माडगूळकरांच्या युट्युब चॅनेलला आताच भेट द्या. […]

पाय

आपल्या हिमतीवर उभे रहाण्यापासून ते xxला लावून पळण्यापर्यंत पायांचा मानवी जीवनात भक्कम पाया आहे. गोष्टींना पाय फुटून त्या नाहीशा होणे किंवा तोंडात पाय (Foot in mouth) घालण्यापर्यंत आपण ऐकलं आहे, पण पायाला तोंड फुटलेलं अजून ऐकिवात नाही म्हणून हा प्रपंच! पाळण्यातले इवले इवले पाय नाचरे निखळ, नितळ निष्पापसे मखमली गोबरे निवांत शांत, भाबडे पहुडले बहुतसे सारे […]

अध्यात्मात सद्गुणांचे महत्व

मार्गांधारे वर्तावि । विश्व हे मोहोरे लावावे ।। या ज्ञानदेवांच्या उक्तीप्रमाणे पू. स्वामी स्वरुपानंदाचे जीवन होते. सहज बोलण्यातून, अत्यंत हळुवारपणे ते साधकाला मार्गर्शन करीत असत. या सर्वांतून सर्वांच्या साधनेला गती मिळत असे. मानवी जीवन हे निवृत्ती व प्रवृत्तीच्या किनाऱ्यातून वाहत असते. साधकही या गतिमान जीवनात हेलकावे घेत असतो. तेव्हा आपले ज्ञानेश्वरी, दासबोध, श्रीमद्भागवतासारखे ग्रंथ, संतांचे अभंग, […]

1 56 57 58 59 60 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..