नवीन लेखन...

चतुर बिरबल

अकबर बादशहाच्या पदरी अनेक सरदार होते. एका सरदाराला उंची दागिने घालण्याचा शौक होता. त्याच्या अंगावर नेहमी हिया-मोत्यांच्या माळा झगमगत असत. […]

श्री अंबिका योग कुटीर ठाणे – एक सेवाव्रती संस्था

ही कथा आहे जवळजवळ सत्तर वर्षांपूर्वीची. तत्कालीन मुंबई इलाख्याच्या पोलीस खात्यामध्ये काम करीत असलेल्या पुंडलिक रामचंद्र निकम नावाच्या कॉन्स्टेबलची, म्हणजेच परमपूज्य हठयोगी निकम गुरुजी यांची. त्यावेळी कोणाला कल्पनाही नसेल की ही व्यक्ती किती महान बनणार आहे व केवळ स्वकर्तृत्वाचे बळावर योग क्षेत्रामध्ये आपली छाप पाडणार आहे. […]

योगासने व प्राणायाम

अनेक ढोबळ मानाने त्यांचे पाश्चात्य व पौर्वात्य असे दोन भाग पाडता येतील. तेव्हा अगोदर व्यायाम म्हणजे काय याचा अर्थ समजावून घेऊ. व्यायाम म्हणजे शरीराची व शरीरातील प्राणशक्तीची ओढाताण करणे किंवा शरीर शक्तीशी झुंज देणे. आयाम म्हणजे शरीर शक्ती व प्राण शक्ती यांना योग्य तऱ्हेने व योग्य दिशेने आणणे, विस्तृत करणे, संचित करणे अथवा थोपवून धरणे, बांध घालणे आणि त्याचा निरोध करणे. […]

भाटांतील पहाट – 2

आळस देत देत बाळकृष्णा भजनाचे सूर आळवीत होता आणि दामू ठाकूर ढोलक्यावर थापा मारीत त्याला साथ करीत होता बाबांच्या मुखांतून रामरक्षा वातावरण भक्तिमय करीत होती त्याचवेळी धोंडू सबनीस नगराची सेवा करण्यासाठी लगबगीने निघाले होते आळसावलेला सदा धुमाळ हातांत मशेरी घेऊन अंगणातच पचापचा थुंकून अंगण काळे करीत होता आणि …. डोक्यावर टोपले घेऊन व फटकूर नेसून सुंद्रा […]

श्री विठ्ठल

विठ्ठलाचा गजर होई गाता-मनातून विठ्ठलाचे रुप दिसे माझ्या माय-बापातून पायावर डोई ठेवी राहो जन्मभरी संग कधी वाचली ती पोथी कधी गायला अभंग पुंडलिका भेटी उभा युगे-युगे राहिशी तुकारामासाठी म्हणे विमान धाडिशी सर्व शांती देई नको चित्त सवंग माझ्या डोळ्यांचे पारणे कधी फिटे पांडुरंग नव्हे कंदी पूजा नाही कधी वारी ना कौतुके साठी मी वारकरी डोळ्यांतून वाहे […]

नागांवची श्री दक्षिणाभिमुखी महाकाली

अतिशय श्रध्देय असणारे जागृत देवस्थान आहे. देऊळ चौसोपी असून भक्तांच्या वंदन पूजन, अर्चन, भजन, किर्तन, पादसेवन आदि सेवांच्या परिपूर्तीसाठीच मुख्यत्वे बांधलेले असल्यामुळे त्याची रचना, उभारणी अतिशय साधी आहे. देवळाचा अलिकडेच जिर्णोध्दार करण्यात आला आहे. हे करताना देवळाच्या मूळ धाटणीत बदल करण्यात आलेला नाही. देऊळ आंग्रे कालीन (वा कदाचित त्या पूर्वीपासून) अस्तित्वात असावे असे पुरावे उपलब्ध आहेत. […]

असेच काहिसे

कुणावर प्रेम करतेस, ते पाहायचंय् स्वतःच्या भावनांवर कि ओठातल्या शब्दांवर नमलेल्या मित्रांच्या गर्दीवर की कुणा वेगळ्यावर निष्पाप तुझ्या डोळ्यांवरकी तुला पाहणाऱ्या डोळ्यांवर कुणावर प्रेम करतेस, ते पहायचंय् नेहमी भिजणाऱ्या पावलावर की नटलेल्या वनराईवर मनाच्या संवेदनेवर की कुणाच्या हृदयावर राकट कुणाच्या देहावर की कोवळ्या मनावर कुणावर प्रेम करतेस, ते पहायचंय् समोर असलेल्या शत्रुवर की कुण्या मित्रावर उंच […]

देवत्व

एकदा त्याला वाटले, आज जाऊन पहावे त्याच्याकडे पहावे त्याला समजते का, की का पाऊले वळली तिकडे? थेट ‘त्या’च्या समोर गेला ‘बघ कळतंय का तुला !’ आव्हानाची भाषा ऐकून, ‘तो’ फक्त मनोमन हसला ‘त्याने’ चक्क विचारले, ‘सुखी आहेस ना बाळा ?’ आश्चर्य वाटून याला वाटले, ‘त्याला’ आला आपला कळवळा ‘काय सांगू देवा तुला…..’ सर्व दुःख त्याने मोकळे […]

कसा सोसेल हा वारा

कसा सोसेल हा वारा पाऊस माझा नाही मीच माझ्या डोळ्यांचा आरसा नाही कसे समजाऊ ह्या विजेला तीच माझी सखी होती ओढ तिला धरेची माझा सावळा मेघ नाही कसा सोसेल हा वारा पाऊस माझा नाही -सौरभ दिघे

नाटक

जीवन हा एक रंगमंच जिथे नसते मंच सज्जा असतात फक्त नटनट्या कळसुत्रीच्या बाहुलीसारख्या ज्यांना असतो एकच आधार पण नसतो एक आकार त्या साऱ्यांना नाचविणारा एकच असतो सुत्रधार घंटा होते, पडदा उघडतो कलाकार मंचावर येतात सुत्रधाराच्या मनाप्रमाणे सारे फक्त नृत्य करतात दुसऱ्या अंकाच्या सुरुवातीला नायकनायिकेचे प्रणयाराधन दिसते पण ते सुद्धा सुत्रधाराच्या मनाप्रमाणेच असते. तिसरा अंक सुरु झालाय […]

1 4 5 6 7 8 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..