दिग्दर्शकांचे ठाणे
लेखकाच्या कल्पनेमधून कागदावर उतरलेलं नाटक, प्रेक्षकांपर्यंत दृश्य स्वरूपात आणण्याची कामगिरी बजावण्याची जबाबदारी ज्याची असते आणि ही जबाबदारी निभावताना आपल्या प्रतिभेनं, कलाकारांच्या मदतीनं, तांत्रिक गोष्टींची मदत घेऊन जो नाटकात प्राण फुंकतो तो दिग्दर्शक. ठाण्याच्या रंगपरंपरेमध्ये दिग्दर्शकीय प्रतिभेनं स्वतचा स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या दिग्दर्शकांची संख्या कमी नाही. राज्य नाट्यस्पर्धांपासून ते व्यावसायिक रंगभूमीपर्यंत दिग्दर्शनाची जादू दाखवणाऱ्या ठाण्याच्या दिग्दर्शकांची गणनाच करायची झाली तर यशवंतराव पालवणकर यांच्यापासून सुरुवात करावी लागेल. […]