साठाव्या आठवणी
आयुष्याच्या मध्यान्ही, संध्याछाया झाकोळण्याआधी कधी वाटतं थांबावं, बसावं घडीभर निवांत आठवणींच्या रेशीमघड्या पसराव्या अलगद उलगडत सावलीला आठवणींचा पदर नि घ्यावी क्षणभर उसंत वळवावी नजर दूर मागे, मनाला रग लागेपर्यंत शिरावं मनाच्या पडवीतून भूतकाळाच्या माजघरात उघडावी कवाडं सारी, आजीबाईंच्या कपाटागत धुंडाळावे भ्रमिष्टागत ते सारे क्षण, काने-कोपरे जगाव्या, हुंगाव्या गतस्मृती, होऊन जिवंत क्षण सारे धुडकावून वर्तमानाचे सारे सावध […]