नवीन लेखन...

कुसुमाग्रजांना श्रद्धांजली

काजव्यांच्या कोलाहलातून भव्य तारा निमाला धरित्रीच्या कुशीमधून आसमंतात झेपावला कोंडलेला श्वास मुक्त झाला, उजाडलं घर अंगण सुनंसुनं झालं सुन्न, उसासलं अवघं तारांगण विध्दलेलं रुद्ध शब्द, श्वास का हा जडावला दाटली श्रद्धा ओठी, डोळ्यांकाठी मोतीहार निखळला – यतीन सामंत

वैज्ञानिकाचा सत्याचा शोध – मनोगत

मी प्रदीर्घ साधना आणि कसोटीच्या काळात गेलो ज्यांचा संदर्भ आवश्यक आहे. याशिवाय सर्वसंग परित्याग, मुक्तीची अतीव ओढ, भक्ती, योग्य गुरू या सर्व गोष्टी अत्यंत महत्त्वपूर्ण असून त्या विचारात घेतल्याच पाहिजेत. या गोष्टी विचारात घेतल्या तरच पुस्तकातील विचारांना अर्थ राहील आणि वाचकांना त्याचा लाभ होईल. […]

ठाण्याचा कलादूत: नरेंद्र बेडेकर

आय.सी.सी.आर. तर्फे भारत सरकारचा सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून नरेंद्रने जपान, रशिया, मॉरिशस, इंडोनिशिया येथे भारतीय कलापथकाचे नेतृत्व केले आहे. प्रजासत्ताकदिनाच्या परेडमध्ये ठाणे जिह्यातील आदिवासी कलावंतांचे पथक नेऊन ठाण्याची आणि महाराष्ट्राची ही मान उंचावण्याचे काम नरेंद्रने केले आहे. […]

काय गंमत आहे पहा!

आयुष्याचे कण कण क्षण साठले कुणी कोठल्या पेढीवरती व्याज राहो मुद्दलही होई झपाट्याने ती केवळ रिती खालती नसे पासबुक नसे स्टेटमेंट तुमच्या आमच्या शिलकीपोटी निर्वाणीची निर्वाणनोटीस येते अचानक जेव्हा हाती तेव्हाच उमगते (काय फायदा?) नव्हती उरली शिल्लक खाती -यतीन सामंत

श्रीगुरुस्तवन

ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरु हा कृपामयी आहे. कैवल्याचे सोने प्रत्येकाच्या पदरात टाकणारा विश्वउदार आहे. तो विचारश्रीमंत आहे. आचारश्रीमंत आहे. तो विवेक श्रीमंतही आहे. इतकेच नव्हे तर सद्गुरु हा खरा सामर्थ्यवान आहे. सद्गुरु हा इतका सामर्थ्यवान आहे की प्रत्येक शिवाचेही सामर्थ्य तो आपल्या केवळ कैवल्य-अस्तित्वाने जिंकून घेतो. कारण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे ती ही की शिव हा निराकारात स्थिर आहे. त्याचे सामर्थ्य हे त्याच्या भक्तांच्या सामर्थ्याच्या तुलनेतच त्या भक्ताकडून तोलले जाते. परंतु सद्गुरुचे सामर्थ्य दृश्य आहे आणि ते काही शिष्यांच्या सामर्थ्यदृष्टीकोनातून कधी तोलले जात नाही तर तो स्वयंभू सामर्थ्यवान आहे. […]

नमनाचं तेल

करेन कोटी, करेन कोटी करेन कोट्या कोटी कोटी सांभाळीन त्या छातीच्या कोटी केवळ अस्सल एक ना खोटी सरस्वती थैमाने ओठी कोटीला मग कसली खोटी – यतीन सामंत

ठाण्याच्या अभिनेत्री

सर्वसाधारणपणे कोणत्याही शहरातील, गावातील हौशी नाट्यसंस्थांना नेहमी सतावणारा प्रश्न म्हणजे नाटकात भूमिका करायला महिला कलाकार कुठून आणायचे? त्यामुळे अनेकदा हौशी स्तरावर नाटकाची निवड करताना एकच स्त्री पात्र असलेल्या नाटकाला प्राधान्य दिले जाते. पण ज्या शहराच्या कणाकणात नाट्य भिनलेलं आहे, त्या ठाण्याच्या हौशी नाट्यमंडळींना या प्रश्नाने फारसे सतावलेले दिसत नाही. त्यामुळेच ठाण्याच्या नाट्यवर्तुळात घडलेल्या आणि स्पर्धांमध्ये, व्यावसायिक […]

गुरुतत्त्वाची सेवा अखंड घडत राहो! (संपादकीय)

‘नामस्मरण” म्हणजे फक्त मुखाने नाम घेणे नव्हे तर त्या नामईश्वराला अभिप्रेत असलेले कर्म करीत जीवन जगावे म्हणजेच कोणत्याही जीवाला दुःख न देता सत्कर्म करीत जीवन जगणे हेच नामाशी अनुसंधान साधणे आहे. […]

अ. भा. मराठी नाट्य परिषद, ठाणे शाखेचा प्रवाह

ठाण्यातील समाजातून वेगवेगळे कलाकार निर्माण झाले पाहिजेत हीच जिगिषा, तळमळ मनांत ठेवून वि. रा. परांजपे व सन्मित्रकार स. पां. जोशी या द्वयींनी पुढाकार घेऊन अ.भा.म.ना. परिषद, ठाणे शाखेची स्थापना १ ऑक्टोबर १९७९ रोजी केली. तो विजया दशमीचा शुभ दिवस होता. […]

कादंबरी ते नाटककार एक प्रवास

ईश्वर प्रेरणेने आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडत असतात. ‘नरेंद्र ते विवेकानंद – एक झंझावात’ हे चरित्र म्हणजे माझ्या आयुष्यातील योगायोग म्हणावा लागेल, किंबहुना हा दैवी चमत्कारच ठरला असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही. विवेकानंदांचे चरित्र वाचता वाचता सांगत गेलो, सांगता सांगता लिहीत गेलो. ते लोकांना आवडेल, त्यांनी उचलून धरले. हे कसे घडले? या प्रश्नांची उत्तरे माझ्याजवळ नाहीत. […]

1 60 61 62 63 64 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..