नवीन लेखन...

खेळ मांडियेला

लेखक क्रिकेटपटु आहेत मुंबईच्या १५ वर्षांखालील संघापासून २५ वर्षांपर्यंतच्या टीमचे कर्णधारपद त्यांनी भूषवले असून रणजी संघाचेही प्रतिनिधित्वही केले आहे. त्यांनी स्पोर्ट्स मॅनेजमेंट ह्या विषयात एमबीए. केले असून Tendulkar Middlesex Sports Academy (TMGA) चे क्रिकेट ऑपरेशन्स मॅनेजर तसेच प्रशिक्षक आहेत. सध्या डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकॅडमी इथे व्हेन्यू मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. […]

।। नामस्मरण भक्ती ।।

अन्नमय आणि प्राणमय कोशा मध्ये वस्तुचे अथवा व्यक्तीचे स्मरण ठेवण्यास तिचे नाम पुन्हा पुन्हा आठवणे अतीशय उपयोगी पडते, म्हणून ज्या वैखरी वाणीने आपण दृष्ट्याशी व्यवहार करतो त्या वाणीने सारखे नाम घेणे हा भगवंताची आठवण ठेवण्याचा प्रथम उपाय आहे. […]

।। श्री समर्थ रामदास स्वामींचे चरित्र ||

समर्थांच्या आयुष्याचे ४ टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला टप्पा (१६०८ ते १६२०) जन्म ते गृहत्याग. दुसरा टप्पा म्हणजे समर्थांनी केलेली साधना, तपश्चर्या (१६२० ते १६३२) ह्या काळात नित्यनेमाने पुरश्चरण, अभ्यास, मनन, चिंतन तिसरा टप्पा (१६३२ ते १६४४) समर्थांनी तिर्थाटन, तिर्थाटनात संपूर्ण देशाचे अवलोकन केले. आणि चौथा टप्पा (१६४४ ते १६८२) समाप्रबोधन, सज्जनगडावर मूर्तीस्थापना आणि अखेर समाधी. […]

माध्यमातील सुवर्णसंधी

लेखक पत्रकार, आकाशवाणी रत्नागिरी केंद्रात ते मराठी निवेदक, मुंबई दूरदर्शन कार्यक्रम विभागात ३४ वर्षे सेवा केल्यानंतर साहाय्यक संचालक (कार्यक्रम) भारतीय कार्यक्रम प्रसारण सेवा (आय.बी.पी.एस.) केंद्रीय माहिती प्रसारण मंत्रालय, या पदावरून निवृत्त असून सध्या प्रसारण माध्यम तज्ञ/सल्लागार आहेत. […]

।। श्री राम समर्थ ।। श्रीसमर्थ रामदासांचा पदसंग्रह – एक विचार

छत्रपती शिवाजी महाराज श्रीसमर्थांच्या आज्ञेप्रमाणे साधन करत. कोणत्याही ऐहिक विषयाच्या ठिकाणी त्यांची वासना नव्हती. पण श्रीतुळजाभवानीने दिलेल्या भवानी तलवार ह्या हत्यारात मात्र ती शिल्लक होती. म्हणूनच भवानी तलवार त्यांनी श्रीसमर्थांपुढे ठेवून नमस्कार केला व त्यांची आज्ञा घेतली. […]

चंदा रणदिवे – लक्षाधीश रंगकर्मी

चंदा रणदिवे एकांकिका व नाटके ज्या काळात बसवत होते, तेव्हा नायिका म्हणून भूमिका करण्यास मुली मिळणे कठीण होते. परंतु चंदा यांना ही अडचण कधीच आली नाही. कारण त्यांचे चोख व निखळ चारित्र्य! त्यांच्याविषयी सर्वांना गाढ विश्वास होता. चंदा दिवेकर, मीना प्रधान, मंगल फणसे, शालिनी राजे, सुनंदा कर्णिक, लता सावंत, उषा गुप्ते. अशा असंख्य हिरॉईन्स चंदा यांच्या नाटकातून घडल्या. […]

भारतीय सेनादले: आवाहन आणि आव्हान

१९६२सालच्या भारत-चीन युद्धात, १९६५ व १९७१भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग. नागा व मिझो बडंखोरांना वठणीवर आणण्याचे अद्वितीय कार्य. २२ वर्षांच्या कार्यकालात २१ वार्षिक मेरिट पदकांसह ७ विशेष सन्मानपदके प्राप्त. मेजर गावंड हे ‘ठाणे भूषण’ आहेतच शिवाय महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या सेवा पुरस्काराचेही ते मानकरी आहेत. ‘संडे मिलिटरी स्कूल’ चे ते संस्थापक असून त्यांनी प्रशिक्षित केलेले ५००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी […]

निखळ आनंदाचा झरा ‘बालनाट्य’

‘चुलबुल पांडा’, ‘गाढवाचा दवाखाना’, ‘जम्बो ससा’, ‘वाघोबाची दिवाळी’, ‘रोबो आणि राक्षस’ या बालनाट्यांनी मुलांना एक वेगळाच फिल दिला. उपहास, नक्कल, कोट्या, फार्स, प्रासंगिक, शाद्बिक विनोद, मेलोड्रामा, ब्लॅक कॉमेडी-हे सगळे काही त्यांना इन्स्टंट कळते आणि त्यांची दादही वेगवान असते. मुले नाटकात काम करताना स्वत खूप हसतात. स्लॅपस्टिक कॉमेडी त्यांना खूप आवडते. दुःख हसण्यावरी नेणे म्हणजे काय हे बालनाट्य करताना कळले. […]

लाटांवरचे करिअर

लेखक व्यापारी नौदलातील निवृत्त कॅप्टन आहेत. शिवाय लेखक आणि कवीही आहेत. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘कोलंबसचे गर्वगीत’ ह्या कवितेने नाविकांची, त्यांच्या धैर्याची, चिकाटीची चपखल ओळख आपल्या कवितेतून करून दिली आहे. नौदल म्हणजे नेव्ही. राष्ट्रीय सागरी सीमांचे रक्षण करणारे दल. जगात सर्वात आधी कुठल्या उद्योगाचे जागतिकीकरण झाले असेल तर ते जहाज उद्योगाचे. अनेक लहान-मोठ्या बंदरांनी युक्त असलेला आणि साडेसात […]

नाट्याभिमानी शशी जोशी

व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना मिळालेली पहिली नवी कोरी भूमिका होती 1974 साली रंगभूमीवर आलेल्या श्याम फडके लिखित आणि राम मुंगी दिग्दर्शित ‘बायको उडाली भुर्रर्र…’ या नाटकातील. धोपेश्वरकर ही विनोदी व्यक्तिरेखा शशी जोशींनी आपल्या ढंगात अशी फर्मास सादर केली की, त्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांची भरभरून दाद मिळाली. या नाटकात त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्याबरोबर एकच प्रसंग होता, पण त्यात ते धम्माल उडवायचे. मग व्यावसायिक रंगभूमीवर एकामागून एक नाटके मिळत गेली […]

1 61 62 63 64 65 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..