नवीन लेखन...

।। श्री राम समर्थ ।। श्रीसमर्थ रामदासांचा पदसंग्रह – एक विचार

छत्रपती शिवाजी महाराज श्रीसमर्थांच्या आज्ञेप्रमाणे साधन करत. कोणत्याही ऐहिक विषयाच्या ठिकाणी त्यांची वासना नव्हती. पण श्रीतुळजाभवानीने दिलेल्या भवानी तलवार ह्या हत्यारात मात्र ती शिल्लक होती. म्हणूनच भवानी तलवार त्यांनी श्रीसमर्थांपुढे ठेवून नमस्कार केला व त्यांची आज्ञा घेतली. […]

चंदा रणदिवे – लक्षाधीश रंगकर्मी

चंदा रणदिवे एकांकिका व नाटके ज्या काळात बसवत होते, तेव्हा नायिका म्हणून भूमिका करण्यास मुली मिळणे कठीण होते. परंतु चंदा यांना ही अडचण कधीच आली नाही. कारण त्यांचे चोख व निखळ चारित्र्य! त्यांच्याविषयी सर्वांना गाढ विश्वास होता. चंदा दिवेकर, मीना प्रधान, मंगल फणसे, शालिनी राजे, सुनंदा कर्णिक, लता सावंत, उषा गुप्ते. अशा असंख्य हिरॉईन्स चंदा यांच्या नाटकातून घडल्या. […]

भारतीय सेनादले: आवाहन आणि आव्हान

१९६२सालच्या भारत-चीन युद्धात, १९६५ व १९७१भारत-पाकिस्तान युद्धात सहभाग. नागा व मिझो बडंखोरांना वठणीवर आणण्याचे अद्वितीय कार्य. २२ वर्षांच्या कार्यकालात २१ वार्षिक मेरिट पदकांसह ७ विशेष सन्मानपदके प्राप्त. मेजर गावंड हे ‘ठाणे भूषण’ आहेतच शिवाय महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या सेवा पुरस्काराचेही ते मानकरी आहेत. ‘संडे मिलिटरी स्कूल’ चे ते संस्थापक असून त्यांनी प्रशिक्षित केलेले ५००० हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनी […]

निखळ आनंदाचा झरा ‘बालनाट्य’

‘चुलबुल पांडा’, ‘गाढवाचा दवाखाना’, ‘जम्बो ससा’, ‘वाघोबाची दिवाळी’, ‘रोबो आणि राक्षस’ या बालनाट्यांनी मुलांना एक वेगळाच फिल दिला. उपहास, नक्कल, कोट्या, फार्स, प्रासंगिक, शाद्बिक विनोद, मेलोड्रामा, ब्लॅक कॉमेडी-हे सगळे काही त्यांना इन्स्टंट कळते आणि त्यांची दादही वेगवान असते. मुले नाटकात काम करताना स्वत खूप हसतात. स्लॅपस्टिक कॉमेडी त्यांना खूप आवडते. दुःख हसण्यावरी नेणे म्हणजे काय हे बालनाट्य करताना कळले. […]

लाटांवरचे करिअर

लेखक व्यापारी नौदलातील निवृत्त कॅप्टन आहेत. शिवाय लेखक आणि कवीही आहेत. कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या ‘कोलंबसचे गर्वगीत’ ह्या कवितेने नाविकांची, त्यांच्या धैर्याची, चिकाटीची चपखल ओळख आपल्या कवितेतून करून दिली आहे. नौदल म्हणजे नेव्ही. राष्ट्रीय सागरी सीमांचे रक्षण करणारे दल. जगात सर्वात आधी कुठल्या उद्योगाचे जागतिकीकरण झाले असेल तर ते जहाज उद्योगाचे. अनेक लहान-मोठ्या बंदरांनी युक्त असलेला आणि साडेसात […]

नाट्याभिमानी शशी जोशी

व्यावसायिक रंगभूमीवर त्यांना मिळालेली पहिली नवी कोरी भूमिका होती 1974 साली रंगभूमीवर आलेल्या श्याम फडके लिखित आणि राम मुंगी दिग्दर्शित ‘बायको उडाली भुर्रर्र…’ या नाटकातील. धोपेश्वरकर ही विनोदी व्यक्तिरेखा शशी जोशींनी आपल्या ढंगात अशी फर्मास सादर केली की, त्यांना प्रेक्षक आणि समीक्षकांची भरभरून दाद मिळाली. या नाटकात त्यांना ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा देशपांडे यांच्याबरोबर एकच प्रसंग होता, पण त्यात ते धम्माल उडवायचे. मग व्यावसायिक रंगभूमीवर एकामागून एक नाटके मिळत गेली […]

सत्याची कास अपेक्षित

गेली २२ वर्षे पत्रकारितेत कार्यरत. सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे वृत्तसंकलन व अंगणवाडी सेविका, कामगार प्रश्न, वनविभाग, अन्न-औषध प्रशासन, महिला आर्थिक विकास ह्या विषयांवर विश्लेषणात्मक लेखन. […]

नाटककार स. पां. जोशी

1950 साली सानेगुरुजींच्या निधनानंतर, सानेगुरुजी स्मारकाच्या हालचाली सुरू झाल्या. त्यावेळी सपांमधील नाटककार जागा झाला. गुरुजींच्या ‘आंतरभारती’ संकल्पनेवर आधारित ‘जीवनकला’ या सपांनी लिहिलेल्या नाटकाचा प्रथम प्रयोग डोंबिवलीच्या स. पां. जोशी विद्यालयाच्या प्रांगणात 9 जानेवारी 1951 रोजी झाला. याच नाटकाचा दुसरा प्रयोग 11 फेब्रुवारी 1951 रोजी झाला. त्यावेळी ‘नवशक्तिकार’ प्रभाकर पाध्ये यांच्या हस्ते नाटकाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. या नाटकास आचार्य अत्र्यांची प्रस्तावना लाभली होती. शं. दि. डोंगरे कृत हिंदी अनुवादाचे प्रकाशन ऑक्टोबर 1951 मध्ये झाले. […]

मी का लिहितो?

मागे एकदा माझे आवडते लेखक श्रीकांत बोजेवर यांनी विचारलं, ‘एक लेख हवा आहे दोन दिवसात. देशील का?’ विषय ‘मी का लिहितो?’ मी म्हटलं, हा प्रश्न तर मी खूप वेळा स्वत:ला विचारून झालो आहे. लेख दोन तासातही देता येईल. मी का लिहितो? या प्रश्नाचं उत्तर देताना मंटो म्हणाला होता, ‘तो आप पूछ रहे हो मै खाना क्यो खाता हूँ?’ ‘लिहिणं’ ही मंटोसाठी नैसर्गिक क्रिया होती, माझ्यासाठी ती प्रतिक्षिप्त क्रिया आहे. […]

ट्रेक ऑन

ऋतू फूड्स आणि Trendy Bytes Ladoowala हे व्यवसाय सांभाळून गेली २८ वर्षे सह्याद्रीमध्ये भ्रमंती, २०० हून अधिक गडकिल्ल्यांवर भ्रमंती, ‘शिवकाव्य’ हे शिवचरित्र प्रकाशित. […]

1 62 63 64 65 66 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..