मराठी वाड्मयातील चरित्रलेखन
गेल्या पन्नास वर्षांत समाजातल्या विविध क्षेत्रातल्या विविध स्तरांवरच्या मान्यवरांची तसेच कार्यकत्यांची चरित्र लिहिली गेली. पण चरित्रकारांनी अभ्यासासाठी निवडलेले चरित्रनायक पाहता, अजूनही बरेचसे चरित्रनायक स्वांतत्र्यपूर्व काळातले असल्याचे दिसते. अर्थात स्वातंत्र्योत्तर काळात स्वकर्तृत्वाने विभिन्न क्षेत्रात कर्तृत्वाने समाजासाठी मार्गदर्शक ठरलेल्या व्यक्तीही नव्या चरित्रकारांनी आपला अभ्यासविषय केल्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. चरित्रकारांच्याही पिढ्या बदलत गेल्याचा तो दृश्य वाङ्मयीन परिणाम होता. […]