नवीन लेखन...

नादावले सखीने

नादावले सखीने मन जडल्या नात्याचे चंद्र पाकळ्यांची बरसात फुलणार मग निशेने भिजशिल गं प्रेमाने सखी कोणता ऋतुमास ओठावरी तुझा ध्यास मन करुन वारुचे ये प्रणयसखे वेगाने भिजशिल गं प्रेमाने भेटशील ना त्या ठिकाणी दुसरे नसेल कोणी क्षण तुझ्या भेटीचे ये करुनि बहाणे भिजशील गं प्रेमाने -सौरभ दिघे

मन भारावते

पाऊस येता मन जाते भाराऊनी सृष्टीचे रुप जाते हिरवेगार होऊनी अनेकांच्या मनातले विचार पाऊस घेतो जाणूनी म्हणूनच ती गाणे गाते संगीतमय होऊनी तृप्त होते जीवसृष्टी मातीचा गंध घेऊनी पण हाच पाऊस कधी कधी जातो काळ बनूनी चातकालाही आवडे पाऊस भारी तो थकतो पावसाची वाट बघूनी समुद्र जातो खवळूनी किनाऱ्यावरील लोक जीव मुठीत बसतात धरुनी लहान मुले […]

आई

आई हा शब्द असतो थोर जो सर्वांच्या ओठावरील असतो मोर आई या शब्दाला नसतो दुजाभाव तो सर्वांच्या मनाचा घेई ठाव वाऱ्याचा वेग जसा अंगाला शहारतो तसाच आईचा स्पर्श मनाला भावतो आईचे प्रेम करते मनाला पल्लवीत ते दृष्टीस पडता मन होते हर्षीत काही करण्याची हिम्मत आईमुळे मिळते म्हणूनच तर ती आत्माला ऑ आणि इश्वरातलाइ असते – भाग्यश्री […]

जीवन

जाई जुईच्या वेलींच्या हा सुंदर पसरला वास लागली मला घरा जाण्याची आस आईचा तो नाजूक हात पित्याचा तो निर्मळ सहवास जीवनाच्या साथीला क्षितीचा हव्यास जीवन म्हणजे एक ध्यास जीवन म्हणजे एक भास जीवन म्हणजे शिक्षणाची आहे रास पण आईबाबाशिवाय जीवनात नाही काही खास भाग्यश्री सतीश प्रधान अलिबाग

सुविचार

जीवनात जर माणूस यशस्वी झाला तर तो समृद्ध होतो व सुख त्याच्या मागे लागते हे पल्याला मोठ्या लोकांच्या (मोठी झालेली लोकं) यांच्या वागणुकीतून दिसते. […]

सूर्यास्त

सूर्य चालला अस्ताला सगळं चैतन्य बरोबर घेऊन प्रकाशही बरोबर घेऊन माणूस गेल्यावरही असंच होत असेल का ? मनापासून शोक सारी माणसं करत असतील का? असंच सगळ चैतन्य प्रकाश बरोबर घेऊन तो जातो पण केवळ आठवणीत मागे उरतो मागे उरतो. सौ. झेलम संजय टिपणीस अलिबाग

आम्ही कायस्थ

आम्हास नाही तमा, संपत्तीची अन सत्तेची जोपासली आहेत आम्ही, नाती निष्ठेची अन् भक्तीची शिवरायांचा जाज्वल्य अभिमान, पाहिला अन् अनुभवलाही म्हणूनच आमच्यातही आम्ही जसाच्या तसा भिनवलाही अन् जपलाही कुलदैवतांच्या कृपेने आणि बुद्धीच्या जोरावर आम्ही अनेक अवघड गणिते सोडविली सत्तेची, राजेशाहीची धुरा आम्हीही सांभाळली इतिहास घडविला आम्ही तेजस्वी लेखणीने आणि तलवारीनेही विविधरंगी कलांनी जीवनेही रंगविली आम्ही आमचे शौर्य, […]

परीराणी आणि बेडूक

परीराणी एकदा उतरली तळ्यात घसरून पाय पडली त्यात हसू लागला कावळा सोबत होता बगळा बेडूक म्हणे! परीताई परीताई “कसली गं एवढी घाई कुठे जायचंय तुला घेऊन चल ना मला मी जातेच मावशी कडे ती राहते नदी पलिकडे यायचंय तर…. चल पण आवाज करायचा नाही मला त्रास द्यायचा नाही दिलास तर परत आणायची नाही म्हणून ‘बेडकाने मारली […]

भाटातली पहाट

पहाटेतून भाट जागे झाले तेव्हा मान उंच करुन चंद्रीचा कोंबडा आरवला खाजणाकडील काला वारा अंगाला झोंबू लागला त्याची पर्वा न करता आसमंताला जाग आली काळोखाचे कांबळे दूर सारीत अवनी जागी झाली कराडी कुटुंबाची वस्ती विझल्या रॉकेलच्या बुदल्या मातीच्या चुलीत अंगार फुलला आणि झावळीच्या झोपडींतून धुराचे ढग उसळले. न बाळगलेली कराड्यांची कलकलणारी कुत्री रात्रभर जागल्याने गटारात घोरत […]

सोप्या शब्दांचा मोठा आशय

या ओळी निव्वळ वाचल्या तरी समजतात. कारण ते शब्द समाजाच्या भट्टीतून आले आहेत. कोठेही आढेवेढे, जड शब्द, गूढ भाव असं काही काहीच त्यात नाही. व्यसनांनी ‘बहकलेल्या’ समाजाला त्या गर्तेतून बाहेर काढून देवघराकडे ओढत नेणारा आध्यात्मिक भाव सामान्यांना सहज कळावा, त्या भावांमध्ये तो लोटपोट व्हावा म्हणून शब्द सहज सुचतात. ते वाचा आणि सुधारणा करा… […]

1 5 6 7 8 9 228
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..