नवीन लेखन...

नट, भाषा आणि गैरसमज

नटाला भाषेची ओळख असणे, जाण असणे तितकेच महत्वाचे आहे पण ते अभिनय करत असताना इतर दैनंदिन जीवनात भाषेचे स्वातंत्र्य ठेवता आले पाहिजे आणि त्याचबरोबर अभिनय करत असताना आपले पात्र काय आहे? त्या पात्राची काय भाषा आहे? याचा अभ्यास करणे हे महत्वाचे आद्यकर्तव्य आहे. […]

नाट्य तपस्वी मामा पेंडसे

१९२९ ते १९६९ अशी सलग ४० वर्षे मामांची रंगयात्रा व्यावसायिक रंगभूमीवर अव्याहत सुरू होती. या यात्रेमध्ये ‘आग्र्याहून सुटका’, ‘बेबंदशाही’, ‘तोतयाचे बंड’, ‘सवाई माधवरावाचा मृत्यु’, ‘भाऊबंदकी’, ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘खडाष्टक’, ‘एक होता म्हातारा’, ‘पंडितराज जगन्नाथ’, ‘स्वामिनी’, ‘सन्यस्त खङ्ग’, ‘देव नाही देव्हाऱयात’, ‘सत्तेचे गुलाम’, ‘स्वर जुळता गीत तुटे’, ‘आंधळ्यांची शाळा’, ‘लोकांचा राजा’, ‘कुलवधू’, ‘महापूर’, ‘नाटककाराच्या शोधात सहा पात्रे’ इत्यादी पन्नासएक नाटकांमधून मामांनी आपल्या लक्षवेधी अभिनयाचे दर्शन प्रेक्षकांना घडवले. […]

ठाण्याची रंगपरंपरा

आज महाराष्ट्राच्या सह-सांस्कृतिक राजधानीचा मान मिरवणाऱया ठाणे शहराचा साधारणत सातव्या शतकापासून लिखित इतिहास आढळतो. या इतिहासात डोकावल्यावर लक्षात येते की, इतिहासकाळात ठाणे हे वैभवाच्या शिखरावर असलेलं, भरभराटीस आलेलं, व्यापारी उलाढालींचे आणि राजकीय हालचालींचे केंद्र असलेलं संपन्न नगर होतं. नाटकाच्या संदर्भातील पहिली नोंद मिळते ती रावबहादूर भास्कर दामोदर पाळंदे यांच्या संदर्भातील. ऑफिशिएटिंग मराठी ट्रान्सलेटर म्हणून सरकार दरबारी काम पाहिलेले पाळंदे साहित्यिक होते.  ‘गीत सुधा’ आणि ‘रत्नमाला’ हे ग्रंथ त्यांनी लिहिले होते. मुख्य म्हणजे ‘विक्रमोर्वशिय’ या संस्कृत नाटकाचे त्यांनी मराठीत गद्य पद्यात्मक भाषांतर केले होते.  तिथून ठाण्याची नाट्यपरंपरा उगम पावली, असं म्हणता येईल. […]

काशी विश्वनाथ धाम

काशी विश्वनाथ धाम हे भारतीय संस्कृती आणि श्रद्धा यांचा सर्वात जुना आणि महान केंद्रबिंदू आहे. आज ते गेल्या तीन हजार वर्षातील सर्वात मोठे आणि भव्य स्वरूप अनुभवत आहे. 250 वर्षांपूर्वी अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिरोे नूतनीकरण केले. त्यानंतरचे हे सर्वात मोठे नूतनीकरण आहे. […]

अणूरसायनशास्त्रज्ञ प्रा. डॉ. हरी जीवन अर्णीकर

रसायनशास्राच्या अध्यापनात मौलिक सुधारणा करण्यासाठी ‘युनेस्को’ने त्यांची ‘पायलट प्रोजेक्ट ऑन टीचिंग केमिस्ट्री’ या प्रकल्पात आंतरराष्ट्रीय सल्लागार म्हणून नेमणूक केली होती. कृत्रिम किरणोत्सर्गाच्या शोधाला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी १९८५ साली भाभा अणू संशोधन केंद्र यांच्या सहकार्याने एक भव्य आंतरराष्ट्रीय चर्चासत्र यशस्वीपणे पार पाडले होते. […]

माणूस कधी बोलू लागला?

मेंदूतील ‘आरक्युएट फॅसिक्यूलस’ ही मेंदूतील नसांची जुडी, भाषा विकसित होण्यासाठी आवश्यक असणारे विविध भाग एकमेकांना जोडते. आर्क्युएट फॅसिक्यूलस हा भाग किती विकसित झाला आहे, यावरून त्या प्राण्याची बोलण्याची क्षमता कळू शकते. […]

सुमंत उवाच… लेखमालिका परिचय

श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या मनाचे श्लोक, दासबोध सारख्या लिखाणातून समर्थांनी जगायचं कसं हे सांगितलं. सुमंत उवाच हे जगावं कसं? या प्रश्नाला समर्थांच्या कृपेने आणि त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन आलेले उत्तर आहे […]

शतायुषी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

शिवशाहीर  बाबासाहेब पुरंदरे यांनी आज शंभराव्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त त्यांच्यावर मराठीसृष्टीच्या लेखकांनी लिहिलेल्या काही लेखांचे हे संकलन…. […]

1 68 69 70 71 72 229
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..