‘कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले मनोहर पर्रीकर
साधी राहणी, स्वच्छ प्रतिमा आणि हसरा चेहरा…’कॉमन मॅन’चं मूर्तिमंत उदाहरण असलेले गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सर्वांना नेहमी आपल्यातलेच एक वाटले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, भाजपचा सामान्य कार्यकर्ता, गोव्याचे मुख्यमंत्री ते देशाचे संरक्षण मंत्री असा पर्रीकर यांचा थक्क करणारा प्रवास होता मात्र यशाची अनेक शिखरं गाठूनही त्यांनी त्यांच्यातला ‘कॉमन मॅन’ अखेरच्या श्वासापर्यंत जपला… […]